आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sydney Siege भारतीय ओलिस अंकितने घेतली होती ऑस्ट्रेलियाची नागरिकता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - येथील मार्टिनप्लेसमध्ये असलेल्या लिंट चॉकलेट कॅफेमध्ये ओलिसांना सोडवण्याचे ऑपरेशन सुमारे 17 तास चालले. या ओलिसांमध्ये असलेल्या दोन भारतीयांचीही मुक्तता करण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी याला दुजोरा दिला आहे. या दोघांपैकी एक असलेले इन्फोसिस कंपनीत काम करणारे अंकित रेड्डी आहेत. एका ऑस्ट्रेलियन चॅनलने केलेल्या दाव्यानुसार शेख मोनिसने ओलिसांना जेवणही दिले पण ते पळून गेल्यानंतर तो खवळला होता.

मोनिसच्या ताब्यातून पळालेल्या अंकित रेड्डीने भारतातील त्याच्या कुटुंबीयांना तो सुखरुप असल्याची माहिती दिली. अंकित मूळ आंध्रप्रदेशच्या गुंटूर जिल्ह्याचा रहिवासी आहे. गेल्या सहा वर्षांपासून तो पत्नी आणि मुलांबरोबर ऑस्ट्रेलियात राहत आहे.

अंकित ऑस्ट्रेलियातील वेळेनुसार सकाळी दहाच्या सुमारास ऑफिसला गेला होता. रस्त्यात असलेल्या मार्टिन कॅफेमध्ये ते गेले होते. त्यावेळी मोनिसने इतरांबरोबर त्याला बंधक बनवले होते. अंकितला नुकतील ऑस्ट्रेलियाचा नागरिकता मिळाली होती. नॅशनल ऑस्ट्रेलियन बँकेचा प्रोजेक्ट संपल्यानंतर ते मेलबर्नहून सिडनीला स्थलांतरीत झाले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अंकितचे कुटुंब आणि घटनेचे फोटो...