आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ट्विटर'च्या जन्माची चित्तरकथा; बालपणीच्या छंदाने जन्मास घातला 'टिवटिवाट'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को- सोशल नेटवर्किंग साइट म्हटल्याबरोबर पहिले नाव ट्विटरचे येते. दैनंदिन जीवनाला अपडेट ठेवणार्‍या ट्विटरच्या जन्माची कथाही तितकीच रंजक आहे. ट्विटरची मूळ संकल्पना खेळाच्या मैदानावर तयार झाली, असे सांगितले, तर कोणी विश्वास ठेवणार नाही. त्याचीच ही कूळकथा आहे.

ज्ॉक डॉर्सी या 37 वर्षीय तरुणाने सुरुवातीला ही संकल्पना मांडली. तीदेखील सॅन फ्रान्सिस्को येथील खेळाच्या एका मैदानावर. डॉर्सी यांची ही संकल्पना नंतर अनेकांच्या प्रयत्नांनंतर प्रत्यक्षात उतरली. डॉर्सी हे ट्विटरच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. ट्विटरची उभारणी केली जात असताना डॉर्सी यांनी आपले मोलाचे योगदान दिले; परंतु नंतर डॉर्सी यांना ट्विटरमधून मूकपणे बाहेर पडावे लागले होते. सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये डॉर्सी यांनी आपला अनुभव विशद केला आहे. मुलाखतीवर आधारित वृत्त रविवारी जारी झाले. त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ‘हॅचिंग ट्विटर : अ ट्र स्टोरी ऑफ मनी, पॉवर, फ्रेंडशिप अँड बिट्रेयल’ या लेखात ट्विटरची उभारणी, लोकप्रियता, पैसा, मैत्री इत्यादी पडद्यामागील घटनाक्रम पहिल्यांदाच जगसमोर आला आहे. पत्रकार निक बिल्टन यांनी हे वास्तव समोर आणले आहे.

ट्विटर @ वॉल स्ट्रीट’!
न्यूयॉर्क- फेसबुकनंतर ट्विटरनेदेखील स्टॉक मार्केटमध्ये प्रवेश केला असून रविवारी त्यासंबंधीची घोषणा करण्यात आली. ट्विटरकडून अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी कंपनीचा आयपीओ लवकरच येणार आहे. न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजवर टीडब्ल्यूटीआर नावाचे ट्विटरचे चिन्ह पाहायला मिळेल.

सुरुवात कशी? : डॉर्सी सुरुवातीला फोनवरून स्वत:ला आणि मित्रांना अपडेट करत. कोठे आहोत, काय करतोय, काय वाटते अशी जुजबी माहिती ई-मेलने पाठवून नोंदवली जाई. ही पद्धत प्रसिद्ध उद्योजक एव्हान विल्यम्स यांनी पाहिली. त्यानंतर त्यांनी डॉर्सी यांना आपल्या ओडिओ कंपनीत नोकरी दिली. विल्यम्स यांनी आपल्या कर्मचार्‍यांना नवीन प्रकल्पासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. तेव्हा डॉर्सी यांनी आपल्या मनातील संकल्पना मांडली. त्यातूनच ट्विटरचा जन्म झाला. पुढे 140 शब्दांत भावना मांडण्याची र्मयादा घालण्यात आली.


लहानपणापासून आकर्षण
डॉर्सी यांना लहानपणापासून माहितीच्या तत्काळ सेवेचे प्रचंड आकर्षण होते. त्या काळी रेडिओचा प्रभाव त्यांच्यावर खूप होता. म्हणूनच त्यांच्या मनात मोठेपणी कमी शब्दांतील संवादाची ताकद लक्षात आली होती. लहानपणी जीवनाबद्दल करिअरबद्दल त्यांना प्रश्न पडत असे. आपण कोठे जाऊ, काय करू अशा उत्सुकतेतूनच पुढे ट्विटर सेवेची कल्पना त्यांच्या डोक्यात चमकली.