आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युद्धाचा ताण: दुस-यांच्या मदत मोहिमेवर मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ख्रिस कायल अमेरिकी नेव्ही सीलचा प्रख्यात नेमबाज होता. तो इराकमध्ये तब्बल चार वेळा तैनात होता. त्याने अनेक शत्रूंना यमसदनी धाडले. 2 फेब्रुवारीला ग्लेन रोज, टेक्सास येथील गन रेंजवर त्याच्यासोबत कोणताही शत्रू नव्हता. तिथे केवळ काइल, त्याचा मित्र आणि त्याचा जुना सहकारी चाड लिटिलफील्ड व 25 वर्षीय माजी मरीन सैनिक एडी रे राउथ होता.

38 वर्षीय काइल अत्यंत अचूक नेमबाज होता. युद्धाच्या अनुभवावरील त्याच्या पुस्तकाची बरीच चर्चा झाली. युद्धावरून परतणा-या मनोबल ढासळलेल्या सैनिकांना तो मदत करत असे. ही बाब ध्यानात घेत काइल राउथला टारगेट प्रॅक्टिससाठी घेऊन जात असे. परंतु, राउथने काइल आणि लिटिलफील्ड यांचीच हत्या केली.

या करुण हत्यांमुळे अमेरिकी सैनिकांमध्ये दु:ख आणि संतापाची लाट पसरली आहे. अनेक प्रश्न हवेत तरंगत आहेत. राउथची मानसिक स्थिती कशी होती? तो पोस्ट ट्रामेटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी, आघातोत्तर विकृती) ने ग्रासला होता? आणि असे असेल तर अमेरिकी सैन्य आपल्या सैनिकांच्या मानसिक आरोग्यासाठी नेमके काय करतेय? सहा फूट दोन इंच उंची असणा-या काइलला इराकमध्ये हल्लेखोर मरीन सैनिकांची सुरक्षा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याने 160 लोकांना आपली मोठी रायफल-300 विंचेस्टर मेग्नमने टिपले होते.

बंदूकधारी नेमबाजांचे (स्नायपर्स) चे लक्ष्य एका गोळीने एक शिकार असते. ते नेहमी जोडीने लपत-छपत शिकार करतात. काइलने दहा वर्षांच्या सेवेनंतर 2009 मध्ये नौदलातून राजीनामा दिला होता. इराकमध्ये तो तैनात असताना त्याला अनेक मेडल्सही मिळाले होते. परतल्यानंतर त्याने अनेक माजी सैनिकांसोबत सिक्युरिटी कंपनी ‘क्राफ्ट इंटरनॅशनल’ बनवली.

कंपनीचे सूत्र काय आहे, हिंसेने समस्या सुटतात. काइलचे पुस्तक ‘अमेरिकन स्नायपर द ऑटोबायोग्राफी ऑफ द मोस्ट लीदल स्नायपर इन अमेरिकन मिलिटरी हिस्ट्री’ला वाचकांनी डोक्यावर घेतले. 2012 मध्ये त्याच्या दहा लाख प्रतींची विक्री झाली. टीव्ही चॅनल्सवरही त्याची मागणी वाढली. त्याने 2011 मध्ये माजी सैनिकांच्या मदतीसाठी फिटको केअर्स फाउंडेशनची स्थापना केली. काइल लिहितात, युद्धावरून परतलेल्या जखमी सैनिकांना सहानुभूतीची गरज नाही. ते एखाद्या नायकाप्रमाणे वर्तणुकीची अपेक्षा करतात.

माजी सैनिकांचे मनोबल नेमबाजीचा सराव करून चांगले राखता येते, असे त्याचे मत होते. दुसरीकडे, अनेक जण त्याच्या या मताशी सहमत नाहीत की, राउथसाठी शूटिंग रेंज योग्य जागा होती. निवृत्त कर्नल एल्सपेथ रिचीच्या मते, मनोरुग्ण असलेल्या तरुणाला शूटिंग रेंजवर घेऊन जाणे वेडेपणाचे होते. वरिष्ठ सैनिक प्रकरणाच्या विभागाने मागील वर्षी माहिती दिली होती की, अफगाणिस्तान, इराकवरून परतणा-या तीनपैकी एका माजी सैनिकावर तणावग्रस्त असल्याने उपचार केले गेले.

राउथचाही यात समावेश होता. तो चार वर्षांपर्यंत मरीन युनिटमध्ये होता. इराक आणि हैतीतही तो तैनात होता. परतल्यानंतर त्याच्याकडे कोणतेही काम नव्हते.

राउथने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये आपल्या आई-वडिलांनाच जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर राउथच्या आईने काइलची मदत घेतली. काइलने फोन करत राउथला ग्लेनरोज, टेक्सास येथील शूटिंग रेंजवर नेमबाजीच्या सरावासाठी बोलावले होते. राउथने तिथे काइल आणि लिटिलफील्डला सेमीऑटोमॅटिक हॅँडगनने गोळ्या घातल्या. अनेक लोकांचे म्हणणे होते, सैन्याने माजी सैनिकांसाठी काही खंबीर पावले उचलावीत.

इराक, अफगाणमधील निवृत्त सैनिक रॉब कुम्फच्या मते, अशा घटना कार्यरत किंवा निवृत्त सैनिकांच्या अपु-या उपचारांमुळे निर्माण होणा-या धोक्यांची सूचना देतात. तज्ज्ञांच्या मते, अशा घटनांची भविष्यवाणी कठीण आहे. आक्रमक वर्तणुकीसाठी पीटीएसडीऐवजी गरिबीच जबाबदार आहे, असे 2012 मध्ये या युद्धातील 1388 सैनिकांच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
- इनपुट : बेलिंडा लुस्कॉम्ब