आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Strict Restriction On Hair Style In Northern Korea; Married Women Should Keep Short Hari

उत्तर कोरियामध्ये हेअर स्टाइलवर निर्बंध ; विवाहित महिलांनी केस कमी ठेवण्याचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग, प्योगाँग - उत्तर कोरियात इंटरनेट वापरानंतर आता तेथील सरकार लोकांच्या हेअर स्टाइलवर घसरले आहे. त्यासाठी एक विशिष्ट यादी तयार करण्यात आली आहे. त्या यादीनुसारच लोकांना हेअर स्टाइल करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हुकूमशाही सरकारने त्यासाठी यादी तयार केली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने यादीतील केशरचनेचा विचार करून आपल्याला योग्य वाटेल ती स्टाइल निवडावी. यादीव्यतिरिक्त हेअर स्टाइल करता येणार नाही. लोकांच्या राहणीमानावर बंधने घालणा-या सरकारने जाहीर केलेल्या यादीतील स्टाइल लोकांच्या अत्यंत सोयीची असल्याचे वरून निर्लज्जपणे म्हटले आहे. हाँगकाँगच्या फिनिक्स टीव्ही नेटवर्कने यासंदर्भातील बातमी प्रसारित केली आहे.नियमांचे उल्लंघन करण्यात आले तर त्यांना कायद्याचा सामना करावा लागणार आहे; परंतु पालन न करणा-या लोकांना काय शिक्षा करण्यात येईल, याचा तपशील समजू शकला नाही. अलीकडे किम जाँग ऊन यांचे डोक्यावर लांब केसातील स्पोर्टिंग स्टाइलमध्ये दर्शन झाले होते. डोक्यावर मध्यभागी उंच केस आणि आजूबाजूला टक्कल केलेल्या स्टाइलमध्ये ते दिसले होते. ही स्टाइल पाश्चात्त्य जगात प्रसिद्ध आहे.

तरुणांच्या केसांसाठी 5 सेंटिमीटरची सक्ती
महिलांना वेगळा नियम : देशातील महिलांसाठी पुरुषांच्या तुलनेत काही वेगळे नियम बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी 18 प्रकारच्या स्टाइल जाहीर करण्यात आल्या आहेत. पंखाप्रमाणे (फिदरी) लूक अनिवार्य करण्यात आला आहे. विवाहितांनी केस कमी ठेवावेत. अविवाहित महिलांना मात्र केश सांभार करण्याची मुभा देण्यात आली आहे.
पुरुषांना 28 ची सक्ती
सरकारने जाहीर केलेल्या यादीत पुरुषांना 28 प्रकारच्या स्टाइलमध्येच आपले केस राखता येतील. त्या व्यतिरिक्त कोणतीही स्टाइल करणे पुरुषांसाठी नियमांचे उल्लंघन करण्यासारखे ठरणार आहे. पंधरा दिवसाला केस कापण्याचे आदेश आहेत. तरुणांना 5 सेंटिमीटरपेक्षा अधिक लांब केस राखता येणार नाहीत. वृद्धांना नियमातून काहीशी सूट देताना 7 सेंटिमीटरपर्यंत केस वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कशासाठी नियमांची कात्री : उत्तर कोरियाने आपल्याच नागरिकांवर अशी विचित्र सक्ती का केली, असा प्रश्न सहजपणे पडतो. त्यामागे भांडवलदारी व्यवस्थेचा राग असे उत्तर दिसून येते. भांडवलशाहीच्या भ्रष्ट परिणामांपासून दूर राहण्यासाठी लोकांना केशरचनेच्या शैलीची सक्ती करण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. देशाचे तरुण नेते किम जाँग ऊन यांना जुन्या स्टाइलमध्ये रस नसल्यामुळे हे बदल घडवण्यात आल्याचेही काहींचे म्हणणे आहे.