आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Strong Earthquake Kills Thoushands In South West China, Divya Marathi

चीनमधील शक्तीशाली भुकंपाने घेतला 381 जणांचा बळी; बघा विदारक PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनमध्ये रविवारी (ता.3) दोन तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. यात 381 चिनी नागरिक मृत्युमुखी पडले तर 1881 जण जखमी झाले आहेत. शेकडो अद्याप बेपत्ता आहेत. युनानमधील झाओटोंग शहरात रविवारी साडेचार वाजता 6.5 रिश्टर स्केलचा धक्का बसला असून यामुळे 12 किलोमीटर परिसराला जोरदार हादरा बसला. भारत-नेपाळ सीमेवरील झिगॅझ येथे 5 रिश्टर स्केलचा धक्का जाणवला.
भूकंपाची 90 लाख 80 हजार लोकांना झळ बसली आहे. मदत कार्यासाठी 2 हजार 500 चिनी जवान झाओटोंग येथे पाठवण्‍यात आले असून त्यांनी आपले कार्य सुरू केले आहे. युनान प्रांताव्यतिरिक्त गोंझाऊ आणि सिचुआन प्रांतातही जबरदस्त भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपामुळे 12 हजार घरे नष्‍ट झाली तर 30 हजार इमारतींना तडे गेले आहेत, असे चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने सांगितले. भूकंपात दूरसंचार व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. मागील 14 वर्षांमध्‍ये पहिल्यांदाच इतके शक्तिशाली भूकंप युनानमध्‍ये झाला आहे. 1970 मध्‍ये याच प्रांतात 7.7 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. यात 1 हजार 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.

घटनाक्रम
- रविवारी (ता. 3) सायंकाळी 4.30 वाजता चीनच्या युनान प्रांतात 6. 5 तीव्रतेचा भूकंप आला
- 12 हजारपेक्षा जास्त घरे नष्‍ट, तर 30 हजार घरांना तडे
- सर्वाधिक झळ लुडियान कौंटी या भागाला बसली
पुढील स्लाइड्सवर पाहा भूकंपानंतरची दारुण छायाचित्रे.....