आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये लाखो विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाला दांडी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग- गेल्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या 70 लाख पदवीधरांना नोकरीसाठी अद्यापही संघर्ष करावा लागत असल्यामुळे चीनमध्ये राष्ट्रीय महाविद्यालय प्रवेश चाचणी देणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा 10 टक्के घट झाली आहे. चीनमध्ये उच्च शिक्षणासाठी शुक्रवार आणि शनिवारी ‘गावकाव’ ही राष्ट्रीय प्रवेश चाचणी परीक्षा होत आहे.

या परीक्षेसाठी 9.12 दशलक्ष विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये ही परीक्षा देणार्‍यांच्या संख्येत घट होत असून 2008 मध्ये 10.5 दशलक्षांवर असलेला आकडा 2012 मध्ये 9.15 दशलक्षांवर आला आहे. बरेच जण परदेशात शिक्षण किंवा कामासाठी जात असल्यामुळे ही परीक्षा देणार्‍यांच्या संख्येत दहा टक्के घट होत आहे, असे शिक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते शी मेई यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत चीनचा आर्थिक विकास दर 10 टक्क्याने वाढताना तेथे पदवीधरांना मोठी मागणी होती. मात्र गेल्या वर्षी तो 7.8 टक्क्यांवर आल्याने पदवीधरांना नोकरीसाठी संघर्ष करावा लागत आहे.