आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्याची कराटे किक; शिक्षिकेचा पाय मोडला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन: शिक्षकांनो सावधान! ब्रिटनमध्ये दहा वर्षांच्या विद्याथ्याने एका शिक्षिकेला जोरदार कराटे किक मारल्यामुळे तिचा पाय मोडला व गुडघ्याची वाटी तुटली आहे.
डियान व्हाइटहेड असे या शिक्षिकेचे नाव असून त्या 54 वर्षांच्या आहेत. त्यांचा मोडलेल्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून किमान वर्षभर घरीच राहावे लागणार आहे.विशेष म्हणजे विद्यार्थ्याकडून मार खाण्याची व्हाइटहेड मॅडमची ही दुसरी वेळ आहे. दोन वर्षांपूर्वी एका विद्यार्थ्याने त्यांना मारल्यामुळे त्यांच्या दोन फासळ्या मोडल्या होत्या.
ही घटना याच महिन्यातील आहे. केंट परगण्यातील आॅर्पिंगटन शहरात बर्वुड शाळा आहे. काही कारणामुळे शिक्षण अर्धवट सुटलेल्या मुलांसाठी ही शाळा आहे. एक मुलगा सारखा वर्गात मस्ती करून इतरांनाही त्रास देत होता. त्याला शांत बसण्यासाठी व्हाइटहेड मॅमनी वारंवार बजावले. पण पोरगं भलतच बंड. तो चिडला. व्हाइटहेड व इतर शिक्षकांनाही तो आवरेना. त्याने शिक्षकांना जोरदार हिसका देत व्हाइटहेड मॅमच्या पायावरच कराटे किक मारली. विद्यार्थ्याने मारलेली ही लाथ एवढी जोरात होती की मॅम कळवळल्या. दोन शिक्षिकांनी तात्काळ अ‍ॅम्बुलन्स बोलावून त्यांना रुग्णालयात दाखल केले. इतर दोन महिला शिक्षकांनाही या झटापटीत गंभीर जखमा झाल्या आहेत. या 10 वर्षीय विद्यार्थ्यास फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत जामीन देण्यात आला आहे.