आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यापीठ परीक्षेत देशातील सगळे विद्यार्थी नापास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉन्रोव्हिया - आफ्रिका खंडाच्या लायबेरियातील विद्यापीठात प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या परीक्षेत देशातील एकाही विद्यार्थ्याला यश मिळवता आले नाही. शब्दश: सर्वच विद्यार्थी नापास झाले! इंग्लिश भाषेच्या ज्ञानाअभावी विद्यार्थ्यांना अपयश आल्याचे सांगण्यात येते.


बातमी वाचून विश्वास बसत नाही. तेच लायबेरियातील सरकारचे झाले. लायबेरियाच्या शिक्षणमंत्री एस्टमोनिया डेव्हिड-टार्पेह यांनाही देशातील शैक्षणिक गुणवत्ता पाहून धक्का बसला. मला निकालावर संशय येत आहे. एखादाही विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकत नाही. यावर विश्वास बसत नाही. मला तर हा प्रकार ‘सामूहिक हत्येसारखा’ वाटू लागला आहे, असे टार्पेह यांनी म्हटले आहे. लायबेरिया विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी देशातील हजारो तरुणांनी ही परीक्षा दिली होती. लायबेरियामध्ये सरकार दोन विद्यापीठ चालवते. त्यापैकी हे एक आहे. विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा पाया अतिशय कच्चा आहे. त्याचेच प्रतिबिंब परीक्षेत पडल्याचे विद्यापीठाच्या अधिका-यांनी सांगितले. देशाची राष्ट्रभाषा इंग्रजी असूनही विद्यार्थ्यांना त्याचे सखोल ज्ञान नसल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील शिक्षण क्षेत्राचा अद्याप अपेक्षित विकास झालेला नाही. त्यामुळे या क्षेत्रात विकास करण्यास पुरेसा वाव आहे. देशातील शालेय स्तरावर पायाभूत साधनांचा अभाव आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज राष्ट्राध्यक्ष एलन जॉन्सन सिरलीफ यांनी व्यक्त केली आहे. एलन यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळालेला आहे.
स्वप्न पाण्यात : शैक्षणिक सत्राला सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. निकाल अतिशय निराशाजनक असून आमच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले आहे, अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी बीबीसीशी बोलताना दिली.


देशभरातील विद्यार्थी नापासाचे कारण काय?
लायबेरियाने गृहयुद्धाचे चटके सोसले आहेत. दहा वर्षांपूर्वीच देश त्यातून बाहेर पडला. त्यातून सावरत देशाची वाटचाल सुरू आहे. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात गेल्या दहा वर्षांतील वाटचाल फारशी आशादायी झालेली नाही. देशातील शाळांमध्ये अजूनही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यातून विद्यार्थ्यांचा विकास योग्य त-हेने होत नसल्याचे दिसून येते.


आफ्रिकेतील 41 लाख लोकांचा देश
पश्चिम आफ्रिकेतील एक छोटा देश अशी लायबेरियाची ओळख. देशाची राष्ट्रभाषा इंग्रजी आहे. इतर तीस भाषाही देशात बोलल्या जातात. सुमारे 41 लाख 28 हजार अशी लोकसंख्या असलेल्या लायबेरियाच्या सीमेशेजारी गिनीआ देश आहे.
25 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.