आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटो काढण्‍याची अशीही त-हा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दक्षिण कोरियन कलाकार एहन जेन अशाच प्रकारे गगनचुंबी इमारतींवर स्वत:चे फोटो क्लिक करते. एहन जेन यांचे हे फोटो सेल्फ पोर्ट्रेट किंवा फोटोशॉपची कलाकृती वाटू शकते, पण ही कलाकृती नसून एक धाडस आहे. हाँगकाँग, सेऊल आणि न्यूयॉर्कच्या गगनचुंबी इमारतींवर चढून ती स्वत: स्वत:चे फोटो क्लिक करते. हे फोटो काढण्यासाठी ती एक सेल्फ टायमर कॅमेरा वापरते.

मेमरी कार्ड फुल होईपर्यंत ती एका सेकंदात जास्तीत जास्त फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करते. या हजारो फोटोंपैकी ती एका फोटोची निवड करते. ज्या फोटोमध्ये मी घाबरलेली नसून शांत आणि अ‍ॅग्रेसिव्ह दिसते, असा फोटो मी निवडते, असे एहन सांगते. असा फोटो काढण्यात खूप जोखीम असते, पण जास्तीत जास्त खबरदारी बाळगण्याचा प्रयत्न करते. एहन यांनी स्वत:चा घेतलेला हा सर्वात धाडसी फोटो आहे. सेऊलमधील एका उंच बिल्डिंगच्या काठावर एकाच पायावर शरीराचा संपूर्ण भार देऊन ती अशा प्रकारे उभी होती.

guardian.co.uk