आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुभाषबाबूंना भेटल्यावर हिटलरने मागितली होती माफी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी झालेल्या भेटीत जर्मनीचा हुकुमशाहा ऐडॉल्फ हिटलर याला शरमेने मान खाली घालावी लागली होती. त्याचे कारण होते हिटलरची आत्मकथा 'मीन कॅम्फ'. या पुस्तकात भारत आणि भारतीयांसंबंधी आक्षेपार्ह्य लिखान करण्यात आले होते. जेव्हा नेताजींनी हिटलरकडे त्याबद्दल नाराजी व्यक्त केली तेव्हा त्याने माफी मागितली होती. हिटलरने नेताजींना तो वादग्रस्त मजकूर पुस्तकातून काढून टाकण्याचे आश्वासनही दिले होते.

१९४४ मध्ये अमेरिकेचे पत्रकार लुई फिशर यांच्याशी झालेल्या चर्चे महात्मा गांधीजींनी सुभाषबाबूंना देशभक्तांचे देशभक्त म्हटले होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे. २३ जानेवारी १८९७ मध्ये कटक (ओडिसा) येथील एका संपन्न बंगाली कुटुंबात त्यांचा जन्म झाला. दुस-या महायुद्धाच्या वेळी इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती.