आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sucessful Treatment In America On Hiv Affected Girl

एचआयव्हीग्रस्त मुलीवर अमेरिकेत यशस्वी उपचार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिकागो - अमेरिकेतील मिसिसिपी राज्यातील एका एचआयव्हीबाधित मुलीवर यशस्वी उपचार करून तिचा आजार पूर्णपणे बरा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आयुष्यात पाऊल टाकतानाच ही चिमुकली एचआयव्हीबाधित होती. यामुळे जन्माच्या 30 तासानंतरच तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. ही बालिका आता अडीच वर्षांची असून वर्षभरापासून कोणतेही औषध न घेता तिची प्रकृती पूर्णपणे ठणठणीत आहे. एचआयव्हीवरील यशस्वी उपचाराचे हे आतापर्यंतचे दुसरेच प्रकरण आहे.

‘मिसिसिपी चाइल्ड’ नावाने ओळखल्या जाणा-या या चिमुकलीवर जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या व्हायरोलॉजिस्ट डॉ. डेबरा परसाद यांच्या चमूने औषध-उपचार केले. नवजातांच्या एचआयव्ही संसर्गावर यशस्वी उपचार होऊ शकतात हे यातून सिद्ध होत असल्याचे डॉ. परसाद म्हणाल्या. एचआयव्हीच्या बहुतेक प्रकरणांत औषध बंद करताच पुन्हा विषाणूंचे संक्रमण वाढते. अशा परिस्थितीत ‘मिसिसिपी चाइल्ड’ बरी होणे हा चमत्कारच असल्याचेही त्यांनी सांगितले. मुलीस तिच्या आईकडून एचआयव्ही संसर्ग झाला होता.
*डॉ. डेबरा परसाद
व्हायरोलॉजिस्ट,
जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी
औषधांच्या ‘कॉकटेल’ने झाले उपचार
*मिसिसिपी विद्यापीठ वैद्यकीय केंद्राच्या डॉ. हाना गे्र यांनी मुलीच्या जन्माच्या 30 दिवसांनंतरच सुरू केले होते उपचार
*एचआयव्हीवरील सध्याचे औषध जिडोवुडिन (एझेडटी), लेमीवुडिन व नेव्हिरापिन यांच्या मिश्रणातून नवे औषध.
*औषधांचे कॉकटेल मुलीस नियमित दिले. पुढील 29 दिवसांत तिच्या शरीरातील विषाणू संक्रमण कमी होत गेले.
*18 महिन्यांपर्यंत हा डोस दिल्यानंतर तपासणीत विषाणू पूर्णपणे नष्ट झाल्याचे आले निदर्शनास.
2007 मध्ये पहिल्या रुग्णावर झाले उपचार
जर्मनीचे टिमोथी रे ब्राऊन हे एचआयव्हीमुक्त होणारे पहिले व्यक्ती आहेत. 2007 मध्ये स्टेम सेल प्रत्यारोपणाद्वारे त्यांच्यावर उपचार झाले. एचआयव्हीबाधित रे यांना ल्युकेमिया झाला होता. स्टेम सेलसाठी एचआयव्ही प्रतिरोधक दाता शोधून काढण्यात आला. या तंत्राने ब्राऊन यांच्या शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणा बदलली गेली.