आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणीही यावं अन् शब्दकोड्याचं कोडं सोडवून जावं!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - शब्दकोडी सोडवण्याचा छंद असणार्‍यांसाठी ही बातमी आहे. तुम्हाला हा छंद काही वर्षांनी नक्कीच तरबेज करेल; परंतु त्यासाठी किमान नऊ वर्षे याचा सराव करावा लागेल, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

ब्रिटनमधील संशोधकांनी हा दावा केला आहे. शब्दकोडे सोडवण्यासाठी बुद्धिमत्तेपेक्षा अनुभवाची अधिक गरज असते. कारण दीर्घकालीन अनुभवातून शब्दांची ही गंमतजंमत जुळवून आणता येते. शब्दांचा हा गुंता अगदी एखाद्या वर्षातदेखील सोडवण्याचे कसब हाती येऊ शकते; परंतु त्यात तरबेज होण्यासाठी अनेक वर्षे द्यावी लागतात, असे मानसशास्त्रज्ञांना वाटते. कोडे सोडवताना ‘युरेका’ क्षण अनुभवता येतात. काही तरी नवीन शोध लागल्याचा आनंद लोकांना कोडी सोडवताना मिळवता येतो. लोकांचा हा अनुभव जाणून घेण्यासाठी संशोधकांनी 750 जणांचा अभ्यास केला. क्लिष्ट प्रश्न सोडवताना प्रयोगातील अनेकांनी तासन्तास घालवले. त्यांना आपला प्रश्न कोणत्याही परिस्थितीत सोडवण्याची इच्छा होत होती. काही जणांना बुचकळ्यात टाकणारे कोडे सोडवता आले. कठीण पर्शिमातून त्यांना हे साध्य झाल्याचे पाहायला मिळाले.

कोडी सोडवणे बुद्धिमत्तेपेक्षा अनुभवावर आधारित असे कौशल्य आहे, सातत्याने सात ते नऊ वर्षे कोडी सोडवण्याचा सराव झाला तर व्यक्ती तरबेज होते. त्यासाठी बुद्धिमत्तेचा फारसा संबंध नसतो, असे बकिंगहम विद्यापीठाचे डॉ. फिलीप फाइन व डॉ. कॅथरिन फ्रिडलांडर यांनी म्हटले आहे.

काय सापडले ?
पझल्समध्ये उत्तरे शोधणारे नवीन लोक आणि अनुभवी यांच्यात खूप अंतर असते. अनुभवी उत्तराचा शोध वेगळ्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतात, म्हणूनच बुद्धिमत्तेपेक्षा अधिक कोडी सोडवण्याचा अनुभव कोडी सोडवताना सहायक ठरतो, असे त्यात संशोधकांना आढळून आले.

कशावर भर ?
ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या प्रयोगात सहभागी कार्यकर्त्यांनी आपली सुरुवातीची कार्यक्षमता पझल्समध्ये गुंतवली. अशा प्रश्नात उत्तरे संकेत किंवा इतर खाणाखुणांत दडलेली असतात. ती शोधणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटले.