आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suicide Attack Claimed 21 In Kabul, 13 Foreigners

काबूलमध्ये आत्मघाती हल्ल्यात 21 जण ठार,मृतांमध्ये 13 विदेशी नागरिकांचा समावेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल - अफगाणिस्तानची राजधानी पुन्हा एकदा दहशतवादी स्फोटाने हादरली. तालिबानने घडवून आणलेल्या स्फोटात 13 विदेशी नागरिकांसह 21 जणांचा मृत्यू झाला. आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) अफगाणिस्तानातील प्रमुख वादेल अब्दुल्लाह यांच्यासह संयुक्त राष्‍ट्राच्या चार प्रतिनिधींचा मृतांमध्ये समावेश असून या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने स्वीकारली आहे.
पोलिसांनी सांगितले की, एका लेबनॉनी रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास आधी स्फोट आणि नंतर अंधाधुंद गोळीबार झाला. एका आत्मघाती हल्लेखोराने बाहेरच्या गेटजवळ स्वत:ला उडवून दिले. दोन हल्लेखोरांनी गोळीबार करतच आत प्रवेश केला. आत जेवण करत असलेल्या लोकांवर त्यांनी जबरदस्त गोळीबार केला. विदेशी दूतावास असलेल्या अकबर खान जिला भागात हे रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी विविध दूतावासातील अधिकारी, भोजन घेतात. संयुक्त राष्‍ट्राचे प्रवक्ते फरहान खान यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये ब्रिटन, रशिया, कॅनडियन नागरिकांचा समावेश आहे. मृतांमध्ये अमेरिकी दूतावासातील कर्मचा-यांचा समावेश नसल्याची माहिती अमेरिकन विदेश विभागाने जारी केली आहे.
बदला घेण्यासाठी स्फोट
तालिबानच्या प्रवक्त्याने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मंगळवारी परवान भागात झालेल्या हवाई हल्ल्याचा बदला घेण्यासाठी म्हणून हा हल्ला केला. नाटोचे सैनिक परतल्यानंतर पुन्हा आमचीच सत्ता येईल, असेही तालिबाने म्हटले आहे. टवरना हे लेबनॉनी रेस्टॉरंट काबूलमधील सर्वाधिक सुरक्षा असलेले रेस्टॉरंट आहे. कडेकोट सुरक्षा असतानाही विदेशी नागरिकांना लक्ष्य करून हा आत्मघाती हल्ला झाला.