आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Suicide Attack Kills 21 In Kandahar: Afghan Police

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तालिबानचे जन्मस्थळ कंदहारमध्ये बॉम्बस्फोट, २१ ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल - अफगाणिस्तानातील कंदाहारमध्ये झालेल्या बॉंबस्फोटात २१ जण ठार तर २२ जण जखमी झाले आहेत. अशी माहिती कंदहार पोलिसांनी दिली.

दक्षिण अफगाणिस्तानातील कंदाहारजवळ एका बाजारपेठेत मोटरसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. अतिशय वर्दळीच्या ठिकाणी ही बॉम्ब असलेली मोटरसायकल ठेवण्यात आली होती. या ठिकाणापासून जवळच नाटोची रसद ने-आण करणारे ट्रक उभे राहातात. अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी अब्दूल रझिक यांनी दिली.
मृतांमध्ये सर्व स्थानिकांचा समावेश आहे, एकही सैनिक यात जखमी देखील झालेला नाही. असेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानात 19 बॉम्बस्फोट
हिंसाचार: इराकमध्ये बॉम्बस्फोट मालिका,44 नागरिकांचा मृत्यू
इराकवर हल्ले;अडीच तास बॉम्बस्फोट, गोळीबार