काबूल- काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात चार जण ठार झाले. मृतांमध्ये तीन परदेशी नागरिक आणि एक अफगाण यांचा समावेश असल्याची माहिती स्थानिक पोलिसाने दिली.
हल्ल्याची जबाबदारी तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुहाजिद यांनी घेतली आहे. या स्फोटात 15 सैनिक मारली गेली असून अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे ,असे मुहाजिद याने सांगितले. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर रॉकेटने हल्ला करण्यात आला. परंतु अद्याप या घटनेला पुष्टी मिळालेली नाही, असे अफगाण वृत्तसंस्था खामा प्रेसने स्पष्ट केले आहे.
(File Photo - काही दिवसांपूर्वी काबूल विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी सुरक्षा पथक तैनात करण्यात आले होते. )