आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियातील रेल्वेस्थानकावर झालेल्या स्फोटात 18 जण ठार, तर 50 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को - रशियाच्या व्होल्गाग्राड शहरातील रेल्वेस्थानकात आत्मघाती हल्लेखोराने घडवून आणलेल्या स्फोटात किमान 18 नागरिक ठार झाले. दुपारी 12.45 वाजता झालेल्या या स्फोटात 50 हून जास्त लोक जखमी झाले. हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की, स्थानकावरील दोन मजल्यांच्या खिडक्यांची तावदाने तुटली.
रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील मेटल डिटेक्टरसमोर महिला हल्लेखोराने स्वत:ला उडवून दिल्याची माहिती राष्‍ट्रीय दहशतवादविरोधी समितीने दिली. पोलिसांनी दहशतवादविरोधी पथकाबरोबर संयुक्त चौकशी सुरू केली आहे. हा हल्ला दागेस्तान किंवा चेचेन्याच्या अतिरेक्यांनी घडवून आणला असावा अशी शक्यता दहशतवादविरोधी समितीने व्यक्त केली आहे. अतिरेक्यांचा म्होरक्या दोकू उमारोव याने सोचीमधील विंटर ऑलिम्पिक रोखण्याची धमकी दिली होती. यासाठी त्याने सामान्य लोकांवर निशाणा साधणार असल्याचे म्हटले होते. गेल्या दोन महिन्यांतील अशा प्रकारची दुसरी घटना आहे.
* 50 हून जास्त जखमी
*दहशतवादी महिलेने स्वत:ला उडवल
*दोन महिन्यांतील दुसरी घटना
*फेब्रुवारीत विंटर ऑलिम्पिकचे आयोजन
विंटर ऑलिम्पिकसाठी कडक सुरक्षा
सोचीमध्ये 4 ते 23 फेब्रुवारीदरम्यान विंटर ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे. या हल्ल्यानंतर सरकारने स्पर्धा स्थळाची सुरक्षा आणखी कडक केली आहे.
अतिरेक्यांचा गड उत्तर काकेशस
सोची शहर व्होल्गाग्राडपासून 690 कि.मी. अंतरावर आहे. हा उत्तर काकेशस भागातील दोगस्तान आणि चेचेन्याजवळ आहे. उत्तर काकेशस मुस्लिम दहशतवाद्यांचा गड मानला जातो.
महिला बॉम्बरचा हल्ला
महिला आत्मघाती दहशतवाद्यांनी रशियात दशकभरामध्ये 20 हल्ले केले आहेत. यामध्ये जवळपास 800 लोकांचा मृत्यू झाला आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, स्फोटाची आणखी छायाचित्रे..