आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Suleman Abu Gaith News In Marathi, Al Quade, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लादेनचा जावई गैथ यास अमेरिकेत जन्मठेपेची शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेने खात्मा केलेला अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा जावई सुलेमान अबू गैथ याला अमेरिकेतील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. ९/११ चा हल्ला व नंतरच्या अल कायदाच्या दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात असल्याचा त्याच्यावर आरोप होता.
गैथ याच्यावर अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यास पकडण्यात आले होते.