आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sultan Of Brunei Bids For New York\'s Plaza Hotel Sahara

सहाराचे हॉटेल विकत घेण्याची ऑफर देणारे ब्रुनोईचे सुलतान फिरतात सोन्याच्या विमानात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - ब्रुनोईचे सुलतान हसनल बोलकिया यांच्याशी संबंधीत एका कंपनीने सहारांच्या हॉटेल खरेदीसाठी ऑफर दिली आहे. यामुळे सुलतान बोलकिया चर्चेत आले आहेत. सहाराश्री सुब्रतो रॉय सध्या तिहार तुरुंगात आहे. त्यांच्यावर गुंतवणूक दारांचे पैसे परत न करण्याचा आरोप आहे. त्यांना जामीनासाठी 10 हजार कोटी रुपये जमा करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे त्यांनी लंडनमधील दोन व अमेरिकेतील एक हॉटेल विक्रीला काढली आहे.
सुलतानाकडे फिरण्यासाठी सोन्याचे विमान आणि कार
सुलतान हसनल बोलकिया हे जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत वरच्या क्रमांकावर असतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे येथील तेल विहीरी या रिझर्व्ह आहेत. 1980 मध्ये सुलतान प्रथमच जगातील धनाढ्यांमध्ये गणले जाऊ लागले. 1990 मध्ये हा किताब बिल गेट्स यांना मिळाला. सुलतान बोलकिया यांच्याकडे जवळपास 1200 अब्ज रुपये संपत्ती आहे. त्यांच्या श्रीमंतीचा अंदाज त्यांच्या लावण्यासाठी एकच उदाहरण पुरेसे आहे. ते सोन्याच्या विमानातून आणि सोन्याच्या कारमधून प्रवास करतात. याशिवाय त्यांच्या गॅरेजमध्ये तब्बल सात हजार कार उभ्या आहेत.
सुलतान बोलकिया यांचा जन्म 15 जुलै 1946 मध्ये ब्रुनोई टाऊन येथे झाला. त्यांनी क्लाललंपूर येथील व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटमधून शालेय शिक्षण घेतले आणि इंग्लंडच्या रॉयल मिलिटरी अकॅडमीमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. आयलँड ऑफ बोरनिया येथे ब्रुनोई हा फार छोटा मात्र अतिशय श्रीमंत देश आहे. येथील ऐकूण लोकसंख्या 4,15,000 आहे.
हॉलिवूड कलाकारांचा आहे बहिष्कार
सुलतानाची लंडनमध्ये मोठी मालमत्ता आहे. हॉलिवूडमधील प्रसिद्ध हॉटेल बेवर्ली हिल्स त्यांच्याच मालकीची आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या देशात एक असा कायदा तयार केला, की की चोरी किंवा समलैंगिक संबंध ठेवले तर त्या व्यक्तीला दगड मारून ठार मारले जाईल किंवा त्याच्या शरीराचा एखादा अवयव तोडला जाईल. इस्लामी शरिया कायद्यांर्तगत ही शिक्षा बजावली जाणार आहे. या कायद्यामुळे हॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या हॉटेल बेवर्ली हिल्सवर बहिष्कार टाकलेला आहे.

पुढील स्लाइडमध्ये, सुलतानाची पर्सनल लाइफ