आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: या देशातील उन्हाळी कँपमध्‍ये शिकवले जाते दुसऱ्याला ठार मारण्‍याचे तंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - उन्हाळ्यातील कँपमध्‍ये' मजा, मस्ती करण्‍याची खूप संधी मिळत असते. मात्र दक्षिणेतील गाझा पट्टीमध्‍ये हमास या दहशतवादी संघटनेकडून चालवण्‍यात येणा-या उन्हाळ्यातील कँप हा वेगळाच आहे. येथे भेकड माणसाला कोणतेही स्थान नाही. या कँपमध्‍ये रक्त, घाम आणि आग याची गरज असते. जो ही सर्व सहन करतो तो कँपचा खरा हिरो ठरतो. हमास चालवत असलेल्या क्रूर अशा उन्हाळी कँपमध्‍ये हजारो पॅलीस्टाइन मुलांनी सहभाग घेतला आहे. त्यांना लष्करी जवानांना देण्‍यात येणारे कडक असे प्रशिक्षण दिले जात आहे.
रणरणत्या उन्हात, मुले भडकलेल्या आगीला पार करत आहेत, हे तुम्हाला छायाचित्रामध्‍ये दिसेल. त्यांना होत असलेली पीडाही लपवून राहत नाही. जगातील दुस-या भागातील मुले नाइट क्लबमध्‍ये मस्ती करण्‍यासाठी जातात. गाझातील मुले नेहमी दहशतवादाचे शिकार होतात, असे कँपचे संचालन करणारे अब्देल नसर यांनी सांगितले. प्रशिक्षणात क्लाश्निकोव्ह रायफल, रणगाडा चालवण्‍याचे शिकवले जाते. 70 सत्रांमधून जाणारे हे विद्यार्थी प्रशिक्षणानंतर खूप प्रभावित होऊन जातात. आमची मुले रॉकेट आणि स्फोटांच्या आवाजांमध्‍ये वाढली आहेत, असे नसर यांनी सांगितले.
दहशतवादी संघटना हमास आणि इस्त्रायलमध्‍ये नेहमी संघर्ष होतो. इस्त्रायल, अमेरिका आणि युरोपीय संघात या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. मात्र अरब राष्‍ट्रांमध्‍ये असे नाही. यामुळेच हमास मुलांमध्‍ये इस्त्रायलविरूध्‍द तिरस्काराची पेरणी करत आहे.

पुढे पाहा हमास स्टाइल उन्हाळी कँपमधील निष्‍पाप मुलांची छायाचित्रे.....