आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ज्यावेळी भारतात होळीची धुम होती त्याचवेळी काही ब्रिटीश विद्यार्थ्यांनी स्पेनच्या रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत ओंगळवाणे प्रदर्शन करून तेथील नागरिकांच्या नाकीनऊ आणले. स्पेनच्या सालो येथील एका रिसॉर्टमध्ये आयोजित सालो फेस्टिव्हलसाठी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आले होते. पार्टीनंतर नशेत तरर्र झालेल्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. काहींवर मद्याचा अंमल एवढा झाला होता की, त्यांना उभे राहणे देखील शक्य होत नव्हते. रस्त्याच्या कडेला नको त्या अवस्थेत हे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी पडलेल्या होत्या. काहींनी भर रस्त्यातच अंगावरील कपडे काढून फेकून दिले होते. रहदारीच्या रस्त्यांवर या विद्यार्थ्यांनी मारामारी सुरू केली होती. यामुळे आसपासच्या लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले होते.
स्थानिकांनी या अश्लिल पार्टीचा विरोध करत पोलिसात तक्रार केली. मात्र, प्रशासनाने अशा पार्ट्यांमधून मोठ्या प्रमाणात पैसा (रेव्हेन्यू) मिळतो, असे कारण पुढे करत त्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली. स्पेनमध्ये एक आठवडा साजरा केला जात असलेला हा फेस्टिव्हल एक स्पोर्टस् टूर असतो.
विद्यार्थ्यांच्या या लज्जास्पद वागणूकीने हैराण नागरिकांनी प्रशासनाला त्यांना आवर घालण्याची विनंती केली तेव्हा, प्रशासनाच्या प्रवक्त्यांनी, नागरिकांना यामुळे त्रास होत असल्याचे मान्य करत, या पार्ट्यांमुळे मिळणा-या उत्पन्नातून या भागाचा विकास केला जातो असे सांगितले.
रविरारी रात्रीपासून सुरु झालेल्या या पार्टीनंतर विद्यार्थी हातात बिअरच्या बॉटल घेऊन सर्रास फिरत होते.
पुढील स्लाईड मध्ये पाहा...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.