आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संडे सरप्राइज : 11 वर्षांच्या दानशूराला जगाने वाहिली श्रद्धांजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - आपल्या मृत्यूनंतर सर्व उपयुक्त अवयव दान केले जावेत, अशी ब्रेन कॅन्सरशी झगडणार्‍या 11 वर्षांच्या लियांग याओईची इच्छा होती. आई-वडिलांना ते आवडले नाही. मात्र, लियांगच्या जिद्दीपुढे त्यांचे काही चालले नाही. शेवटच्या काही क्षणांत आई-वडिलांसोबत त्याच्या झालेल्या संवादावेळी डॉक्टरही उपस्थित होते. मुलाचे धाडस पाहून तेदेखील अस्वस्थ झाले. चीनच्या झांगशन विद्यापीठ रुग्णालयात लियांगने अखेरचा श्वास घेतला तो अनेकांसाठी नवा श्वास देऊन. त्याचा मृतदेह वॉर्डबाहेर आणण्यात आला तेव्हा डॉक्टरांसह सर्व स्टाफने तीन वेळा झुकून श्रद्धांजली अर्पण केली. इंटरनेटवर या मुलाची सर्वाधिक चर्चा त्याचे धाडस आणि प्रभावशाली फोटो व अवयवदानाविषयी राहिली.

प्रदूषणाविरोधातील लढ्यात केरळमध्ये चिनी सायकली रस्त्यावर

दिव्य मराठी नेटवर्क. तिरुवनंतपुरम
केरळची बायसिकलिंग प्रमोशन कौन्सिल चीनकडून सायकलचे सुटे भाग मागवून राज्यात जोडणी सुरू करणार आहे. राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी स्वस्तातील सायकली पुरवण्यासाठी संघटनेने हा पुढाकार घेतला आहे. कौन्सिलचे अध्यक्ष सी.ई. चक्कुननी म्हणाले, गेल्या काही दिवसांत आम्ही 15 देशांना भेटी दिल्या. संयुक्त अरब अमिरात, युरोपीय देशांमध्ये पेट्रोलची उपलब्धता असतानादेखील सायकलीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आम्हीही असा प्रयत्न चालवला आहे.

छायाचित्र : डॉक्टरांनी मान झुकवून लियांगला श्रद्धांजली अर्पण केल्याचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. त्यावर हजारो कॉमेंट दिल्या जात आहेत.