आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपर कॉम्प्युटर निर्मितीचा मान चौथ्यांदा चीनलाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटरचा मान सलग चौथ्या वर्षी चीनला मिळाला आहे. तिअॅन्हे-२ अर्थात मिल्की वे-२ या चीनमधील राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठाने विकसित केलेल्या कॉम्प्युटरने चौथ्याही वर्षी जगातील सर्वोत्कृष्ट कॉम्प्युटरचा किताब मिळवला आहे. हे कॉम्प्युटर प्रत्येक सेकंदाला ३३.८६ पेटाफ्लॉप या वेगाने काम करते. म्हणजेच ते दर सेकंदाला अगणित गणिते करू शकते. दक्षिण चीनमधील ग्वांग्झू प्रांतातील नॅशनल सुपरकॉम्प्युटर सेंटरमध्ये हे कॉम्प्युटर ठेवण्यात आले असून त्याच्या वेगात आणखी सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

स्पर्धेतील अन्य वेगवान कॉम्प्युटर

अमेरिका-जपानमध्ये स्पर्धा
जपानचा केहे कॉम्प्युटरहीपहिल्या पाच वेगवान कॉम्प्युटर्समध्ये समाविष्ट आहे.

3 ऱ्याक्रमांकावर सिक्वोनियाअमेरिकेतीललॉरेन्स लाइव्हमोअर नॅशनल लॅबोरेटरी

१० व्याक्रमांकावरील अमेरिकेच्या कॉम्प्युटरचा सेकंदाला ३.५७ पेटाफ्लॉप एवढा वेग असून ते अमेरिकन सरकारच्या एका वेबसाइटसाठी वापरले जाते.

क्रमांकावर टायटनअमेरिकेतीलओक रिज नॅशनल लेबॉरेटरीत कार्यरत. प्रतिसेकंद १७.५९
पेटाफ्लॉप
कॉम्प्युटरचा वेग मोजण्यासाठी पेटाफ्लॉप हे परिमाण वापरले जाते. एक पेटाफ्लॉप म्हणजे सेकंदाला दहा हजार खर्व गणना करण्याची क्षमता.

अमेरिकाही स्पर्धेत मागे
चीनपेक्षाहीवेगवान कॉम्प्युटर तयार करण्याचे अमेरिकेचे प्रयत्न असतानाच जगातील सर्वोत्कृष्ट ५०० कॉम्प्युटर्सची यादी जाहीर झाली. गेल्या आठवड्यातच अमेरिकेने चीनच्या तिअॅन्हे-२ पेक्षाही पाचपटींनी वेगवान कॉम्प्युटर तयार करण्यासाठी ३२५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे घोषित केले होते. दरम्यान, टेनेम्सी विद्यापीठाचे प्रोफेसर जॅक डाँगेरा यांच्या मते, अमेरिकेचे हे कॉम्प्युटर २०१८ पर्यंत निर्माण होईल. त्यामुळे तोपर्यंत चीनच्या सुपरकॉम्प्युटरवर मात करणारे जगात कोणतेही अन्य मशीन नसेल.