आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे लेसर विकसित झाल्‍यामुळे इंटरनेट होणार आणखी सुपरफास्‍ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन-इंटरनेटचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या ऑप्टिकल फायबरमधील डाटा पाठवण्याची क्षमता कैकपटींनी वाढवणारे नवे लेसर किरण विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. त्यामुळे आता इंटरनेट अधिक वेगवान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हाय-कोहेरन्स सेमीकंडक्टर लेसर असे या नव्या किरणाचे नामकरण करण्यात आले आहे.कॅलिफोर्निया तंत्रज्ञान संस्थेतील संशोधकांनी सलग पाच वर्षे केलेल्या संशोधनाची फलर्शुती या नवीन लेसरच्या विकासात झाली आहे. राष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या कामकाजात हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. नव्या लेसर किरणाच्या शोधामुळे इंटरनेटच्या वाढीव बँडविड्थच्या मागणीची जगाची भूक सहजगत्या भागवता येणार आहे.
10,000 पटींहून जास्त क्षमता
लांब पल्ल्याच्या संप्रेषणासाठी वापरण्यात येणाºया मायक्रोवेव्ह या डाटा वाहकाच्या तुलनेत नवीन लेसर किरणाची बँडविड्थ किमान 10,000 पटींनी अधिक असून तेवढ्याच वेगाने माहितीचे वहन करण्यास ते सक्षम आहे. या लेसर किरणाची ही क्षमता अधिक कार्यक्षमपणे वापरण्यासाठी तो जास्तीत जास्त शुद्ध असणे आवश्यक आहे.
सध्याची यंत्रणा गरजेपुढे तोकडी
सध्या जगभरातील ऑप्टिकल फायबर नेटवर्कमध्ये डिस्ट्रिब्युटेड-फीडबॅक सेमीकंडक्टर (एस-डीएफबी) नावाने ओळखले जाणारे लेसर किरण वापरण्यात येते. 1970 च्या मध्यास ते विकसित करण्यात आले होते.
का भासली गरज?
एस-डीएफबी लेसरमध्ये आयआयआय-व्ही नावाचा गॅलियम अर्सेनाइड आणि इंडियम फॉस्फाइडच्या स्फटिकांचा थर असतो. त्याचे प्रकाशात रूपांतर होते. आयआयआय-व्ही सेमीकंडक्टर हे मोठ्या प्रमाणावर प्रकाशाचे संश्लेषण करतात. त्याचा प्रतिकूल परिणाम डाटा पाठवण्याचा वेग आणि गुणवत्तेवर होतो म्हणून संशोधकांना नवीन लेसर विकसित करण्याची गरज भासली.
वाढीव बँडविड्थची
एस-डीएफबी लेसर ऑपप्टिकल फायबर संप्रेषणामध्ये चाळीस वर्षांपासून यशस्वीरीत्या वापरण्यात येत असले तरी वाढीव बँडविड्थची मागणी पूर्ण करण्यात ही यंत्रणा अपयशी ठरली आहे.
नव्या लेसरमध्ये फरक काय?
एस-डीएफबी लेसर आणि नवीन लेसर किरणातील मूलभूत फरक असा की, हे लेसर प्रकाशाचे अजिबात संश्लेषण न करणा-या सिलिकॉनमध्ये प्रकाश साठवून ठेवते. परिणामी या लेसरला वाढीव बँडविड्थ, डाटा पाठवण्याची प्रचंड मोठी क्षमता प्राप्त होते.