आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावॉशिंग्टन- व्हच्यरुअल जगात तुम्ही स्वत:ला कशा प्रकारे मांडता, त्याचाच परिणाम तुमच्या खर्या आयुष्यात पाहायला मिळतो. त्यामुळे सुपरमॅनचा गेम खेळणारा खर्या जीवनात सुपरहीरोसारखा जगू लागतो, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
व्हच्यरुअल जगात पाच मिनिटे घालवली तर त्याचा वैयक्तिक जीवनावर परिणाम होऊ शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. नायक किंवा खलनायक पाहणारे त्याच पद्धतीने वागतात. त्यामुळे त्यांना इतरांकडून फटकारले जाण्याचादेखील अनुभव येतो, असे प्रमुख संशोधक गुनवू यून यांनी सांगितले. गुनवू हे इलिनिऑस विद्यापीठातील संशोधक आहेत. यून आणि त्यांचे सहकारी पॅट्रिक वर्गस यांनी मात्र व्हच्यरुअल जगाचा फायदा सांगितला. खर्या जगामध्ये ज्या गोष्टी करता येत नाहीत अशा लोकांना व्हिडिओ गेमच्या विश्वात निश्चितपणे एक ओळख निर्माण करण्याची संधी मिळते. त्यामुळे र्मयादित अर्थाने हे जग चांगले आहे, असे वर्गस यांना वाटते. संशोधकांनी व्हच्र्युअल जगातील प्रतिमांचा परिणाम जाणून घेण्यासाठी काही पदवीपूर्व तरुणांच्या वर्तनाचा अभ्यास केला. 194 विद्यार्थ्यांना व्हच्यरुअल जगाची सफर घडवून त्यांचे निरीक्षण करण्यात आले.
दैनंदिन जीवनात प्रभाव
व्हच्यरुअल जगात वावरतात एखादी व्यक्ती नायक किंवा खलनायक होत असेल तर त्याचा त्याच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होऊ शकतो, असे अभ्यासात दिसून आले. रोजच्या व्यवहारात तो आभासी जगातील प्रतिमेसारखा वागू शकतो, असे संशोधकांना वाटते.
5 मिनिटे पुरेशी : व्हिडिओ गेम पाच मिनिटे जरी खेळला तरी त्याचा प्रभाव व्यक्तिमत्त्वावर होऊ शकतो. त्यात असलेल्या अनेक अवतारांचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर होतो. शत्रूशी लढणे, अशक्य गोष्टी सहज पूर्ण करणे इत्यादींचा परिणाम होतो. सुपरमॅनची भूमिका घेणार्या सहभागी विद्यार्थ्याला पहिल्या प्रयोगात विशिष्ट चॉकलेट देण्यात आले होते. त्यानंतर त्याला मिरचीचे सॉस देण्यात आले. हे सॉस त्याने मोठय़ा प्रमाणात खाल्ले. हा बदल सुपरमॅनचे पात्र होऊन खेळल्यामुळेच घडून आल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.