आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तानच्‍या सर्वोच्‍च न्यायालयाचा पंतप्रधानांना अटक करण्‍याचा आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेज अशरफ यांना 24 तासांत अटक करण्याचे आदेश मंगळवारी सुप्रीम कोर्टाने दिले. वीज प्रकल्पाच्या उभारणीत 22 अब्ज रुपयांची लाच घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ‘तेहरिक मिनहाज उल कुरान’चे प्रमुख डॉ. ताहिर-उल-कादरी यांनी सरकार बरखास्त करण्याची मागणी करत महामोर्चा काढला असताना हा निकाल धडकला. दरम्यान, राष्‍ट्र पती आसिफ अली झरदारी दुबईला रवाना झाल्याचे वृत्त आहे. सरकारी सूत्रांनी मात्र याला दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, सत्ता लष्कराच्या हाती जाण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
दोन पर्याय :

*पंतप्रधान दोषी ठरले नसल्याने राजीनाम्याची गरज नाही.

* पंतप्रधानपदी अन्य नेत्याची निवड शक्य.

निम्मे काम झाले, उरलेले उद्या करू : कादरी
‘मिनहाज-उल-कुरान’चे प्रमुख ताहिर-उल-कादरी यांचा महामोर्चा मंगळवारी पहाटे लाहोरहून इस्लामाबादेत पोहोचला. या वेळी बोलताना कादरी यांनी पाकिस्तान सरकार तातडीने बरखास्त करावे, अशी जोरदार मागणी केली. दरम्यान, दुपारी दीडच्या सुमारास पंतप्रधानांच्या अटकेचे आदेश असल्याची बातमी आली. यावर कादरी म्हणाले, ‘निम्मे काम झाले आहे, उरलेले उद्या करून टाकू.’

लष्कर, कोर्ट, कादरींची हातमिळवणी?
*कादरींची सभा सुरू असतानाच निकाल आला.
*14 डिसेंबरच्या निकालाची घोषणा मंगळवारी झाली.

*कादरींनी निकालाचे वारंवार स्वागत केले.

*पंतप्रधान, राष्‍ट्र पतींना ‘माजी’ असे संबोधले.

कादरींसोबत कोण?
लष्कर आणि न्यायपालिका, परवेज मुशर्रफ, इस्लामी आणि शैक्षणिक संघटना

विरोधात कोण?
सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टी, विरोधी पक्ष पीएमएलएन