आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुप्रिया सुळे, शत्रुघ्न सिन्हा पाक दौ-यावर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा, ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्यासह संसद सदस्यांचा एक जत्था पाकिस्तानच्या भेटीवर गेला आहे. आज शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह सुप्रिया सुळे, शाहनवाझ हुसेन यांनी पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल झिया उल हक यांची मुलगी झेन झिया हिची भेट घेतली.
शत्रुघ्न सिन्हा यांचे झिया कुटुंबीयांशी जिव्हाळ्याचे नाते असून झियांची मुलगी झेन हिला ते आपली बहीण मानतात. गेल्या 25 वर्षांपासून त्यांनी हे जिव्हाळ्याचे नाते जपले आहे. आज इस्लामाबादेत झियांच्या घरी गेल्यानंतर झेन यांच्या चेह-यावरील आनंद लपत नव्हता.झिया उल हक असल्यापासून सिन्हा कुटुंबीयांशी त्यांचे निकटचे संबंध होते.त्यांच्या निधनानंतरही त्यांनी हे नाते आजतागायत जपले आहे. मला पाहून झेन हिला खूपच आनंद झाला.ती माझी आवडती बहीण आहे.बिर्याणी,फिश फ्राय सह विविध शाकाहारी पदार्थाचा लज्जतदार खाना ठेवला होता. शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.
झेन झिया यांच्या सोबतच पाकिस्तानचे माजी मंत्री इजाज उल हक व कुटुंबीयही या वेळी उपस्थित होते.