आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिकेत आहेत 55 अब्जाधीश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आफ्रिकेत 55 अब्जाधीश आहेत. व्हेंचर्स आफ्रिका मासिकानुसार अब्जाधीशांची संयुक्त मालमत्ता 143.88 अब्ज डॉलर्स आहे. इतर काही श्रीमंतांची संपत्ती बघा...

श्रीमंत महिला
फोलोरुंशो अलाकिजा (62)


आफ्रिकेची सर्वात श्रीमंत महिला नायजेरियाची फोलोरुंशो अलाकिजा 7.3 अब्ज डॉलर संपत्तीची मालकीण आहे. त्यांनी फॅशन उद्योगापासून करिअर सुरू केले. 1990 मध्ये एक तेल ब्लॉक खरेदी केला.


सगळ्यात श्रीमंत
अलीको दांगोते, (56)


नायजेरियन व्यावसायिक अलीको दांगोते यांनी 10 वर्षांपूर्वी दांगोते समूह सुरू केला. पश्चिम आफ्रिकेतील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यात दागोते सिमेंटचाही समावेश आहे. समूहाची एकूण संपत्ती 20.2 अब्ज डॉलर आहे.

देशाशी बरोबरी
नाथन किर्श (82)


नाथन किर्शची संपत्ती त्यांचा देश स्वाझीलँडच्या जीडीपी 3.7 अब्ज डॉलर इतकी आहे. त्यांची अंदाजित संपत्ती 3.6 अब्ज डॉलर आहे.
रिअल इस्टेट हा त्यांचा मुख्य
व्यवसाय आहे.


व्यापारी अंदाज
मुहंमद मन्सूर (65)


2.3 अब्ज डॉलरच्या कौटुंबिक फर्म मन्सूर समूहाचे मुहंमद मन्सूर प्रमुख आहेत. ते मिस्त्रची सर्वात मोठी सुपरमार्केट चेन मेट्रो चालवतात. त्यांच्याकडे मॅक्डोनाल्डची फ्रॅँचायझीदेखील आहे.