आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाहणी : पुरुषांना आवडतात भुरकट केस असलेल्या महिला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - सोनेरी केसांच्या महिलांचे सौंदर्य कोणालाही आकर्षित करणारे असते; परंतु साहेबांच्या देशातील पुरुषांना मात्र आता भु-या रंगाचे केस असणारी महिला पसंत पडू लागली आहे. भुरे केस असणा-या महिला पत्नी आणि गर्लफ्रेंड म्हणून अधिक सेन्सिबल असतात, अशी पुरुषांची धारणा आहे, असा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे.
सावळ्या रंगाचे केस असणा-या मुली अधिक संवेदनशील असतात. पत्नी म्हणून त्या अधिक चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडू शकतात. घराची स्वच्छता राखण्यातही त्यांचा हातखंडा असतो. ब्रिटनमधील ब्यूटी अँड हेल्थ रिटेलरकडून करण्यात आलेल्या पाहणीतून ही माहिती पुढे आली आहे. 54 टक्के पुरुषांनी पत्नी म्हणून सावळ्या केसांच्या मुलीस प्राधान्य देण्याचे मान्य केले. 16 टक्के पुरुषांनी मात्र सोनेरी केस असणा-या महिलांना प्राधान्य दिले. 30 टक्के जणांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, गर्लफ्रेंडच्या मुद्द्यावर ब्रिटनमधील पुरुषांचे मत वेगळे आहे. 48 टक्के नागरिकांना भुरे केस असणारी सुंदर मैत्रीण हवी आहे. 27 टक्के जणांना दोन्हीपैकी काहीही नको. काळसर भुरे केस असणा-या महिला अंतर्मुख असतात.