आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Surviving An ISIS Massacre Told His Shocking Story

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुन्नींना सोडले, शियांना ठार मारले, ISIS च्या ताब्यातील इराकी जवानाची थरारक आपबिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद- इराकी लष्कराचा एक जवान ISIS च्या ताब्यातून पळून जाण्यात यशस्वी झाला. परंतु, त्याने सांगितलेली आपबिती अंगावर काटा उभा करणारी आहे. त्याच्यासह इतर जवानांची ISIS च्या दहशतवाद्यांनी कत्तल करण्यास सुरवात केली तेव्हा त्याने मरण्याचे नाटक केले. त्यानंतर किडे, वनस्पती खात जिवंत राहिला. विशेष म्हणजे जवानांची कत्तल करण्यापूर्वी ISIS ने इराकच्या सुन्नी आणि शिया जवानांना वेगवेगळे काढले होते. त्यानंतर सुन्नी जवानांना सोडण्यात आले तर शियांना ठार मारण्यात आले.
या जवानाचे नाव अली हुसैन कादिम असे आहे. जुन महिन्यात तिक्रीतमध्ये ISIS च्या दहशतवाद्यांनी त्याला ताब्यात घेतले होते. तेव्हापासून तो कैदेत होता. त्यानंतर दहशतवाद्यांनी या जवानांची सामूहिक हत्या करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सुन्नी जवानांना मुक्त करण्यात आले. पण शिया समाजाच्या जवानांची अगदी चाळण केली.
23 वर्षीय कादिमने न्युयॉर्क टाईम्सला सांगितले, की आम्हाला गोळ्या घालण्यासाठी जमिनीवर लेटवले. यावेळी आमचे हात बांधले. तीन शिया जवानांना मारल्यानंतर माझा नंबर आला. पण माझे नशिब चांगले होते. दहशतवाद्याने झाडलेली गोळी मला लागली नाही. परंतु, मी मेल्याचे नाटक केले. इतर शिया जवानांच्या मृतदेहांमध्ये माझे शरीर झोकून दिले.
कादिम म्हणाला, की गोळीबार सुरु झाला तेव्हा मला माझ्या मुलीची आठवण आली. ती मला सारखी बोलवत होती, असे वाटत होते. मी माझ्या डोक्याजवळून जाणारी गोळी अनुभवली. त्यानंतर मरण्याचे नाटक केले. मी खाली पडलो तेव्हा एका जवानाच्या शरीरात जीव होता. त्याला बघून दहशतवादी म्हणाले, की याला असेच तडफडत मरू द्या. याचे रक्त असेच वाहू द्या. तो जरा वेळाने मरेल. हा शिया समाजाचा आहे.
पुढील स्लाईडवर बघा, कादिम याने मृतदेहांमध्ये झोपून कसा वाचवला जीव... त्याला आणखी एक जखमी जवान सापडला...बघा इराकी जवानांचा व्हिडिओ...