आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Committed To 'early Settlement' Of Boundary Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीमाप्रश्नी तोडग्यासाठी भारत कटिबद्ध : सुषमा स्वराज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - अमेरिकेसोबतच्या मैत्रीनंतर आता ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ चा नारा बुलंद होताना दिसत आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीन दौर्‍यात चिनी परराष्ट्रमंत्री वांग शी यांची भेट घेतली. दरम्यान, सीमाप्रश्नी तातडीने तोडगा काढण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. त्याचबरोबर भारत-चीन यांच्यातील संबंध बळकट करण्यासाठी सहा कलमी कार्यक्रम सादर केला जाणार असून त्याद्वारे ‘आशियाचे शतक’ हे उभय देशांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल, अशी अपेक्षाही स्वराज यांनी व्यक्त केली.

अरुणाचल प्रदेश सीमा वाद : अरुणाचल प्रदेशाचा २ हजार किलोमीटरचा भाग चीनलगत आहे. त्यावरून उभय देशांत चर्चेच्या आतापर्यंत १७ फेर्‍या झाल्या आहेत. सीमेच्या वादावरून उभय बाजूंनी प्रतिनिधींची चर्चा झाली असली तरी त्यावर अद्याप काहीही तोडगा निघू शकलेला नाही. मोदी-जिनपिंग यांच्यातील चर्चेतही हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्या वेळी दोन्ही नेत्यांनी सीमावाद लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासंबंधी सहमती दर्शवली होती.

भारत-चीन मीडिया महत्त्वाचा : भारत-चीन यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देशांतील प्रसारमाध्यमेदेखील चांगली भूमिका निभावू शकतात, असे मत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले. प्रसारमाध्यमांच्या फोरममध्ये त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला चीनचे माहिती मंत्री जियांग जिआंगुआ यांचीही उपस्थिती होती.

स्वराज यांचा सहाकलमी कार्यक्रम : द्विपक्षीय व्यवहार, प्रादेशिक आणि जागतिक मुद्दे, विकासाची नवीन क्षेत्रे, सामरिक संवाद, दोन्ही देशांतील नागरिकांच्या आकांक्षांची पूर्तता या पद्धतीने दोन्ही देशांनी वाटचाल, दोन्ही देशांनी ‘आशियाई शतका’चे स्वप्न करावे.

समुदायाशी चर्चा
भारतीय राजदूत कार्यालयात स्वराज यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला. मोदी यांनी देशात सुरू केलेल्या अनेक उपक्रम, योजनांची माहिती दिली. त्यात स्वच्छ भारत, गंगा स्वच्छता, बेटी बचाओ बेटी पढाओ यासारखे उपक्रम सुरू आहेत. त्यात प्रत्येक भारतीयाने योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.