आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sushma Swaraj Proposes 6 point Template To Boost India China Ties

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-चीन संबंधावर सुषमा स्वराज यांचे 6 सुत्री मॉडेल, प्रोटोकॉल तोडून राष्ट्रपती जिनपिंग भेट घेणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - बीजिंग विमानतळावर सुषमा स्वराज यांचे स्वागत करताना चीनचे अधिकारी
बीजिंग - अमेरिकेनंतर आता भाजप सरकार आपल्या शेजारील देश चीनसोबत आपले चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच आज बिजिंग येथे पोहोचलेल्या विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी दोन्ही देशांतील संबंध मजबूत करण्यासाठी रविवारी सहा सुत्री मॉडेल सादर केले. चीनच्या चार दिवसीय दौर्‍यावर पोहोचलेल्या सुषमा भारत-चीन फोरमला संबोधित करत म्हणाल्या की, दोन्ही देशांदरम्यान व्यापक स्वरूपातील द्विपक्षीय नाते, क्षेत्रीय आणि जागतिक हितांसंबंधासाठी आणि आशिया शतकासाठीही काम करावे. तसेच मोदी सरकार चीनसोबत सीमा प्रश्नावरही लवकरच निर्णय घेतील, असेही त्या म्हणाल्या.
तर दुसरीकडे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग भारतासोबतच्या द्वीपक्षीय संबंधांना महत्त्व देत प्रोटोकॉल तोडून सुषमा यांच्याशी सोमवारी भेट घेण्यास तयार झाले आहेत. कारण की, चीनचे राष्ट्रपती त्यांच्या देशात आलेल्या कोणत्याही विदेश मंत्र्यांची भेट घेत नाहीत.
काय आहे सुषमा यांचे 6 सूत्री मॉडल
> दोन्ही देशांनी कृतीविषयक दृष्टीकोन (Action Oriented Approach) अवलंब केला पाहिजे.
> भारत आणि चीन यांनी त्यांच्यातील द्विपक्षीय नाते मजबूत करायला हवे.
> क्षेत्रीय आणि जागतीक हितांमध्ये एक दुसर्‍यांकडे लक्ष द्यायला हवे.
> सहयोगासाठी नवीन क्षेत्रांमधील संधी शोधायला हव्यात.
> दोन्ही देशांनी सामरिक संपर्क वाढवावा
> दोन्ही देशांमध्ये 'आशिया शतक (Asian century)' बनवण्यासाठी प्रयत्न करावे.
पुढील स्लाईडवर पाहा, सुषमा स्वराज यांचे चीन दौर्‍या दरम्यानचे इतर फोटो...