आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तमध्‍ये हेरगिरी करणारे संशयित बदक पोलिसांच्या ताब्यात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो - बदकाच्या माध्यमातून हेरगिरी केली जात असल्याचा प्रकार इजिप्तमध्ये उजेडात आला. नाइल नदीच्या पात्रातून बदकांचा थवा जात होता. त्यातील एका बदकाच्या पंखाखाली हेरगिरीसारखे उपकरण सापडले. पोलिसांनी या बदकाला ताब्यात घेतले खरे, परंतु नंतर या संशयाचा फियास्को झाला.

क्वेना या दक्षिण इजिप्त भागातील नाइल नदीच्या पात्रात काही मच्छीमारांना एका बदकाच्या हालचालीवर संशय आला. त्याच्या शरीराला हेरगिरीचे उपकरण लावण्यात आले होते. त्यांनी तत्काळ हे बदक पोलिसांकडे दिले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. सुरक्षा तसेच पर्यावरणविषयक तज्ज्ञ या उपकरणाचा अभ्यास करत आहेत. हे उपकरण कोणत्या कारणासाठी लावण्यात आले होते, त्यामागील उद्देश काय असावा, याचा शोध घेण्यात येत आहे, असे सूत्रांनी सांगितले. हे बदक राष्ट्रीय गुपिते पळवण्यासाठी पाण्यातून सोडण्यात आले असावे इथपर्यंत कयास लावण्यात आले होते. परंतु या उपकरणाची नंतर तपासणी करण्यात आली. त्यात हे उपकरण स्फोटक किंवा हेरगिरीशी संबंधित नसल्याचे सांगण्यात आले. वन्यजीवांचा अभ्यास करण्यासाठी वापरले जाणारे हे यंत्र असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. दरम्यान, इजिप्तमध्ये गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाल्याने सध्या देशात राजकीय अस्थैर्य आहे. त्यामुळे संशयाचे वातावरण पसरले आहे. जानेवारीमध्येदेखील हेरगिरीच्या संशयावरून एका कबुतराला अटक झाली होती.