आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वीडनमध्ये 1967 पूर्वीपर्यंत सर्व वाहने रस्त्याच्या डावीकडूनच चालत होते. 3 डिसेंबर 1967 रोजी येथील वाहतुकीची बाजू बदलण्यात आली. लोकांना उजव्या बाजूने वाहने चालवण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे लोकांना खूप त्रास झाला. विरोधही झाला. त्या दिवसाला स्वीडनमध्ये डेगन एच (एच डे) असे म्हटले जाते. देशात झालेल्या मोठ्या बदलांपैकी हा एक बदल होता. प्रशासकीय निर्णय घेणारी स्वीडनमधील सर्वोच्च संस्था किक्सडेनने 1967पूर्वी चार वर्षे लोकांच्या दिनचर्येत हा बदल रुजवण्यासाठी उपक्रम राबवले. तीन डिसेंबर हा दिवस उजाडण्यापूर्वी रात्रीतूनच रस्त्यांच्या कडेने असलेले सर्व सिग्नल्स आणि इलेक्ट्रिक पोल काढण्यात आले. सकाळ होताच नव्या ठिकाणी सिग्नल लावायला सुरुवात केली. दुसर्या बाजूने रंगवण्याचे कामही सुरू झाले. दुसर्या दिवशी अपघातांच्या 125 घटना घडल्याचे समोर आले. तर त्यापूर्वीच्या सोमवारी 130 ते 198 अपघात झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर अपघातांचे प्रमाण कमी होत गेले. विम्यासाठीचे दावेही 40 टक्के
कमी झाले.
उजव्या बाजूला प्राधान्य देण्याची प्रशासनाने दिलेली कारणे
1. स्वीडनच्या शेजारील देशांत विशेषत: नॉर्वे अणि फिनलँडमध्ये उजवीकडून वाहने चालवण्याचा नियम आहे. या देशांत स्वीडिश नागरिकांना नेहमी जावे लागते.
2. स्वीडनमध्ये बहुतांश लोकांकडे उजवीकडे बसून चालवण्याची वाहने होती. हायवेवरून लोक इतर देशांत जात, तेव्हा अपघात होत असत. तेव्हा टू-लेन हायवे होते.
(pinterest.com)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.