आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sweden\'s Princess Madeleine Marries New York Banker

स्विडनच्या राजकुमारीचा अमेरिकन बँकरशी विवाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्विडनची राजकुमारी मेडेलिन थेरेस एमिली जोसेफाईन अमेरिकेचे बँकर ख्रिस्तोफर ओ नील यांच्याशी विवाहबद्ध झाली आहे. रॉयल पॅलेस ऑफ स्टॉकहोम येथे शनिवारी हा शाही विवाहसोहळा पार पडला. यासाठी राजघराण्यातील सदस्यांसह उद्योगजगतातील अनेक दिग्गज हजर होते.

अमेरिकेचे नागरिक असलेले ओ नील स्वतःचा उद्योग सांभाळातात. शिन्हुआ या वृत्तसंस्थेनुसार त्यांनी लग्नानंतर राजघराण्याचा सदस्य होण्याचे नाकारले असून सर्वसामान्य नागरिक म्हणून राहाण्यालाच त्यांनी पसंती दिली आहे. राजघराण्याचे सदस्य होण्याचे नाकारल्यामुळे त्यांना राजकुमार ही पदवी दिली जाणार नाही. राजघराण्याच्या नियमाप्रमाणे जर कोणी स्विडनचा नागरिक नसेल आणि एखाद्या उद्योगाची जबाबदारी त्याच्यावर असेल तर त्या व्यक्तीला राजघराण्याची पदवी दिली जात नाही.