आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swis Bank Give Account Details; India Become Beneficar

स्विस बँक खात्यांचा तपशील देणार ;भारताला होणार फायदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाव्होस- काळ्या पैशांचा तपशील देण्यास स्विस बँकेने तयारी दाखवली आहे. फेब्रुवारीपासून अशा प्रकारची माहिती मिळणार आहे. भारतासह अनेक देशांच्या विनंतीनंतर स्वित्झर्लंड सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे.
विविध देशांतून बँकेच्या खात्यावर जमा झालेल्या पैशांचा तपशील देण्यास स्विस सरकारने तयार दाखवल्यामुळे भारताला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ही माहिती वैयक्तिक किंवा समुदायाच्या स्वरूपात असेल याविषयी सरकारकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. देशाचा करविषयक नवीन कायदा 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. यासंदर्भातील अध्यादेश स्वित्झर्लंडच्या लोकप्रतिनिधी सभागृहाने मंजूर केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून स्वित्झर्लंडवर अनेक देशांकडून दबाव वाढत होता. बँकांच्या कारभारातील पारदर्शकतेवरून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न उपस्थित केले जात होते. काळा पैसा सुरक्षितपणे ठेवण्याचे ठिकाण म्हणून स्विस बँक ओळखली जाऊ लागली.

खात्यावरील तपशील जाहीर न करण्याची बँकेची अट अनेक गैरव्यवहारांना प्रोत्साहन देणारी असल्याचा आरोप झाल्यानंतर स्वित्झर्लंड सरकारला जाग आली आणि त्यांनी बँकिंग नियमांत सुधारणा करणारा कायदा मंजूर केला आहे. त्याची अंमलबजावणी फेब्रुवारीपासून केली जाणार आहे.
ओईसीडीचा स्वित्झर्लंडवर दबाव
ऑ र्गनाझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑ परेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. युरोपियन देश या संस्थेचे सदस्य आहेत. पॅरिस येथे संस्थेचे मुख्यालय असून संस्थेच्या नियमांचे पालन करणे युरोपिय राष्ट्रांसाठी बंधनकारक असते. कर आणि इतर आर्थिक मुद्द्यांविषयीचे आंतरराष्ट्रीय मापदंडाची काटेकोरपणे अंमलबजावणी करून घेण्याचे काम ही संस्था करते. ओईसीडीच्या मापदंडांचाही स्वित्झर्लंडवर दबाव होता.