आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेस्टेशनवरच विमानात बसा!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वित्झर्लंड - खचाखच गर्दीने भरलेला विमानतळ, गोगलगाईच्या गतीने पुढे सरकणार्‍या लांबच लांब रांगा आणि महागड्या कॉफीचा एक एक घोट घेत करावी लागणारी दीर्घकाळ प्रतीक्षा या सर्वांचा तुम्हाला वीट आलाय? आता विमान प्रवास करण्यासाठी विमानतळावर जाण्याची अजिबात गरज नाही. कुठल्याही नजीकच्या रेल्वेस्टेशनवर जा आणि खुशाल विमानात बसा! स्वित्झर्लंडच्या इकोल पॉलिटेक्निक फेडराल डे लाऊसेनने (ईपीएफएल) क्लीप- एअर या मॉड्युलर विमानाची भन्नाट संकल्पना मांडली आहे. एअर लायनर फ्युजलगेससारखे दिसणारी ही कॅप्सूल प्रत्यक्षात रेलकार आहे. फ्लाइंग विंगच्या साह्याने हे कॅप्सूल उडणार आहे. एका फ्लाइंग विंगला एका वेळी तीन कॅप्सूल जोडता येऊ शकतात. क्लीप एअरमुळे भविष्यातील विमान प्रवासाची संकल्पनाच बदलणार आहे.