आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडनीच्या अतिरेक्याने कॅफेच्या ग्राहक क्रमांक १८३ ला विचारले... ...तर मग तुला पहिली गोळी झाडू?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - सिडनीच्या लिंट चॉकलेट कॅफेमध्ये १५ जणांना ओलीस ठेवणारा अतिरेकी हारुण मुनीस कॅफेतील ग्राहक क्रमांक १८३ ला धडकला होता. ते होते क्रेग स्टोकर. क्रेग म्हणाले की, मी ज्या वेळी कॉफी घेऊन जात होतो तेव्हा एक जण मला धडकला. मी रागात म्हणालो, बघून चाल ना, कुठे जातोस? त्याने मागे वळून पाहिले आणि म्हणाला, तर मग पहिल्यांदा तुझ्यावर गोळी झाडू. त्या माणसाने काळा शर्ट घातला होता. त्यावर पांढ-या अक्षरात काही तरी लिहिले होते. त्याची निळी बॅग मला लागली होती. त्यात काहीतरी जड वस्तू होती. त्यात बंदूक असावी असे आता वाटते. ऑस्ट्रेलियाच्या टूजीबीचा रेडिओ जॉकी हेडलीने एका ओलिसाशी संवाद साधल्याचा दावा केला आहे. दहशतवादी ओलिसांकडून आपला संदेश प्रसारित करू इच्छित होता. ओलीस अतिरेक्याच्या निर्देशानुसार पुन्हा फोनबाबत बोलले. ज्या ओलिसासोबत हेडलीचे बोलणे झाले तो खूप शांत होता. १९७८ नंतरची ही सर्वात मोठी कारवाई होती. त्या वेळी सिडनीच्या हॉटेल हिल्टनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता.

3 मागण्या
केल्या होत्या अतिरेक्यांनी
1 .आयएसचा झेंडा कॅफेत पाठवा.बदल्यात ओलिसांची सुटका करू.
2 .पंतप्रधान अ‍ॅबोट यांच्याशी बोलणी करून दिल्यास पाच ओलिसांची सुटका करू.
3 .शहरात असलेल्या दोन दहशतवाद्यांना स्फोट करण्यास सांगण्याचे मीडियात सांगा. शहरात आणखी दोन बॉम्ब आहेत. माझ्याकडे शॉटगन आणि बॉम्ब आहेत.

"आम्हाला वाचवा' बंधक महिलेची एफबी पोस्ट
कॅफेत बंधक मर्सिया मिखाइल या महिलेने फेसबुकवर पोस्ट टाकली. "आयएस समर्थकांनी मला कॅफेत बंदी बनवले आहे. त्यांच्या काही मागण्या आहेत. त्या पूर्ण न झाल्यास आम्हाला मारून टाकण्याची धमकी देत आहे. आम्हाला मदत हवी आहे. आयएसने ऑस्ट्रेलियावर हल्ला केला हे त्याला जगाला दाखवायचे आहे.'

मुस्लिमांवर संशय नका घेऊ : ट्विटरवरून आवाहन
सिडनीत मुस्लिमांना संशयाच्या दृष्टिकोनातून पाहू नये, यासाठी ट्विट मोहीम चालली. "Iillridewithyou' (आय विल राइड विथ यू) या मोहिमेत लोक वर्णभेदाचा विरोध करताना दिसले. ९/११ च्या हल्ल्यानंतर मुस्लिमांना अमेरिकेच्या नागरिकांचा रोष पत्करावा लागला होता.

जागतिक माध्यमांत हल्ल्याचे तीव्र पडसाद
द मिरर: या ब्रिटिश वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर या प्रकरणाला मुख्य स्थान देण्यात आले. हा आयएसच्या दहशतवाद्यांचा कट असेल, अशी शंका घेतली.
द न्यूयॉर्क टाइम्स: पोलिसांनी कॅफेला कसा घेराव घालून संपूर्ण भागावर ताबा मिळवला, यात एकापेक्षा जास्त दहशतवादी असल्याचे वृत्त या अमेरिकन वर्तमानपत्राने दिले.
सिडनी मॉर्निंग हेराल्ड : या ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राच्या संपादकीय लेखात सिडनीच्या लोकांना शांत राहण्याचे, भीती न बाळगता काम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वेगवेगळ्या झेंड्यांचा वापर केला जातोय....जाणून घ्या त्यांचा अर्थ काय?

1 कॅफेमध्ये लावला होता झेंडा
जागतिक इस्लामिक गट हिज्ब-उत-तहरीरचा झेंडा आहे. हा गट स्वत:ला ऑस्ट्रेलियाचा नवा नागरिक मानतो. यावरील शब्दांचा अर्थ- अल्लाहशिवाय दुसरा ईश्वर नाही आणि मोहम्मद त्याचे संदेशवाहक आहेत.
2 आयएस, अलकायदा आणि अल शबाब
इस्लामिक स्टेट, अल कायदा आणि सोमालियाची अतिरेकी संघटना अल शबाब हा झेंडा वापरते.
3 सीरियाची संघटना जभात-अल-नुसरा
सिरियाची अतिरेकी संघटना नुसरा फ्रंट किंवा जभात- अल-नुसराचा हा झेंडा आहे.
4 अफगाणिस्तानात वापरला गेला
हा तालिबानच्या इस्लामिक अमिरात या संघटनेचा झेंडा आहे. १९९६ ते २००१ दरम्यान याचा अफगाणिस्तानमध्ये उपयोग करण्यात आला होता.
5 अन हा सौदी अरेबियाचा राष्ट्रध्वज
(सर्व इस्लामिक झेंड्यांच्या वरच्या भागात शहादत/शाहदा म्हणजेच धर्माप्रती आदर व्यक्त केलेला असतो. झेंडा ४ व १ सारखेच आहेत. फक्त त्यांचा रंग वेगळा आहे.)