सिडनी - ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील मार्टिन प्लेस येथील लिंट चॉकलेट कॅफेमधील सर्व ओलिसांची सुटका करण्यात आली आहे. जवळपास 17 तासांनंतर पोलिसांना हे ऑपरेशन यशस्वी करण्यत यश आले आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8:30 च्या सुमारास हे ओलिस नाट्या संपूष्टात आल्याचे तेथील पोलिसांनी अधिकृतपणे घेषित केले. ओलिस ठेवण्यात आलेल्या बंधकांमध्ये इंफोसिसचा एक भारतीय कर्मचारी अंकित रेड्डी हा देखील सहभागी होता. बंधक आलेल्या काही व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. मुळचा ईराणी असलेल्या शेख मोनिसने या सर्वांना ओलिस ठेवले होते.
मुळचा ईराणी आहे शेख मोनिस
स्वत:ला मुस्लिम धर्मगुरु म्हणणारा शेख मोनिस हा 49 वर्षाचा आहे. 1996 मध्ये तो ईराणमधून ऑस्ट्रेलियामध्ये आला होता. त्याने अफगाणिस्तान युद्धाच्यावेळी ऑस्ट्रेलियन सैनिकांना तैनात केल्याचा विरोध केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोनिस युद्धात शहिद झालेल्या ऑस्ट्रेलियन सैनिकांच्या परि वारातील सदस्यांना तुम्ही वाईट आहात असे ई-मेल पाठवत होता. त्याला यापूर्वी पहिल्या पत्नीच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आले होते असे पोलिसांनी सांगितले. तसेच त्याच्यावर अनेक महिलांचे यौनशोषण केल्याचा देखील आरोप आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा लिंट चॉकलेट कॅफेतील ओलिस ऑपरेशनचे PHOTOS....