आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्‍वेस्‍टर स्‍टॅलोनच्‍या मुलाचा आकस्मिक मृत्‍यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस ऍन्जेलिस - प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता सिल्व्हेस्टर स्टॅलोनचा मुलगा आणि चित्रपट निर्माता सेज स्टॅलोन (36) याच्‍या आकस्मिक मृत्‍यूने खळबळ उडाली आहे. त्‍याच्‍या घरातील एका खोलीत रुममध्ये तो मृतावस्‍थेत आढळून आला. सेज याने अभिनेता म्‍हणूनदेखील काही चित्रपटात काम केले आहे.
सिल्‍वेस्‍टर स्‍टॅलोनने हॉलिवूडचा एक काळ थरारक ऍक्‍शनपटांनी गाजविला. 'रॉकी' ही चित्रपटांची मालिका खूप गाजली. 1990 मध्‍ये 'रॉकी-5' या भागात लहानपणीच्‍या रॉकीची भूमिका सेजने केली होती. सेजने काही चित्रपटांची निर्मिती केली होती. त्‍याचे वकील जॉर्ज ब्राऊनस्‍टेन यांनी सांगितले की, त्‍याच्‍यावर कोणत्‍याही प्रकारचा तणाव नव्‍हता. तो अतिशय चांगल्‍या मनस्थितीत होता. विविध विषयांवर चित्रपट निर्मितीचे काम त्‍याने हाती घेतले होते. तो लवकरच लग्‍नही करणार होता. त्‍याचा असा अचानक मृत्‍यू अतिशय दुर्दैवी आहे.
सेजच्‍या मृत्‍यूचे कारण अद्याप कळलेले नाही. औषधांच्‍या ओव्‍हरडोसमुळे मृत्‍यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
व्हिटनी ह्युस्टनचा मृत्‍यू, अंत्यसंस्कारात चाहत्यांना नो एन्ट्री