आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीरियन लष्‍कराच्या हल्ल्यात 21 मृत, तर 100 जण जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेरुत - सीरियन लष्‍कराच्या विमानाच्या बॉम्ब हल्ल्यात 21 लोक मृत पावली, तर 100 जखमी झाली. हल्ला इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या उत्तर सीरियात झाला. सीरियाच्या लष्‍कराने हेलिकॉप्टरमधून बॅरल बॉम्ब आणि युध्‍द विमानातून अॅलेप्पो शहराजवळ अल-बबवर हल्ला केल्याचे ब्रिटनमधील स‍ीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स या संस्थेने रविवारी सांगितले.

21 मृतांमध्‍ये एका मुलाचा समावेश असून हा आकडा वाढू शकतो, असे ऑब्झर्व्हेटरीने सांगितले. अमेरिकेने चालवलेल्या विमान हल्यात आतापर्यंत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सध्‍या हल्ल्याबाबत कोणतीही आकडेवारी मिळालेली नाही, असे सीरियाच्या सरकारी माध्‍यमांनी सांगितले.