आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराकवर सिरियाचा हवाई हल्ला; 57 ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - आयएसआयएस दहशतवाद्यांच्या हिंसक कारवायांनी ग्रासलेल्या इराकमधील अल अनबार प्रांतावर सिरियाच्या लष्कराने हवाई हल्ले चढवले. रुतबा, अल वालिद आणि कॅममधील बाजारपेठा आणि तेल साठे सिरियाच्या हवाई हल्ल्यांचे लक्ष्य होते. मंगळवारी करण्यात आलेल्या या हल्ल्यात 57 लोक मारले गेले, तर 120 जण जखमी झाले.

सिरियाच्या सीमेकडून आलेले विमान हल्ले करून परतले, असे अनबार प्रांताचे प्रमुख सबाह खरखूट यांनी सांगितले. या हल्ल्यांबाबत सिरियाने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सिरियातील अल नुसरा या दहशतवादी संघटनेने आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी हातमिळवणी केल्यामुळे सिरियाने हे हवाई हल्ले चढवले. सिरियाच्या लष्कराने सिरियाच्या उत्तरेला दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावरही हवाई हल्ले केले, तर दहशतवाद्यांनी बैजीतील तेल शुद्धीकरण प्रकल्प तीन बाजूंनी घेरून दहशतवाद्यांनी हल्ले केले आणि यथरिब या भागाला दहशतवाद्यांनी लक्ष्य बनवले. अमेरिकेने हवाई हल्ले केले तर त्याल जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा आयएसआयएस या दहशतवाद्यांनी दिला आहे. सिरियातील अल नुसरा फ्रंटने आयएसआयएलमध्ये विलिनिकरण झाल्याची घोषणा केली आहे.
अमेरिकी नियंत्रणातील हवाई तळावर हल्ला
दहशतवाद्यांनी इराकमधील कॅम्प अ‍ॅनाकोंडा या सर्वात मोठ्या हवाई दल तळावर हल्ला चढवला. हा हवाई तळ अमेरिकेच्या नियंत्रणात आहे. इराक सरकारच्या मदतीसाठी अमेरिकेचे लष्करी सल्लागारांचे पथक दाखल झालेले असतानाच हा हल्ला करण्यात आल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. अमेरिकी पथकात पाकिस्तानमध्ये घुसून अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला ठार मारणार्‍या नेव्ही सील कमांडोंचा समावेश आहे.
सर्व पर्याय खुले : राजनाथ
इराकमध्ये अकडलेल्या सर्व भारतीयांच्या सुरक्षित सुटकेसाठी सर्व पर्यायांवर विचार करण्यात येत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी नवी दिल्लीत सांगितले. सरकारने इराकच्या नजफ, करबला आणि बसरामध्ये विशेष छावण्या उघडल्या आहेत.

संयुक्त सरकारला नकार
पंतप्रधान नुरी अल मलिकी यांनी आणीबाणी सामूहिक सरकार स्थापण्यास नकार दिला आहे.आपणच सरकार स्थापन करू, असा त्यांचा दावा आहे. शियांनी सुन्नी मुस्लिमांवर दहशतवाद्यांशी हातमिळवणीचा आरोप केला आहे.

छायाचित्र : ISIS दहशतवाद्यांची एक तुकडी.