आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS & VIDEO: ब्रिटनकडूनच सिरियाला विषारी रसायनांची विक्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - सिरियावर सलग तीन दिवस हल्ला करण्याची अमेरिकेची योजना आहे. प्रथम क्षेपणास्त्रांनी जोरदार हल्ले केले जातील. त्यानंतर उर्वरित ठिकाणांना लक्ष्य केले जाईल. प्राथमिक योजनेच्या तुलनेत तीन दिवसांचा हा कालावधी जास्त आहे.


सिरियाविरुद्ध लष्करी कारवाईसंबंधी अमेरिकी काँग्रेसमध्ये उद्या सोमवारी चर्चा आणि मतदान होणार असून त्यापूर्वीच अमेरिकी सिनेटच्या पॅनलने रासायनिक हल्ल्याच्या 13 व्हिडिओ चित्रफिती जारी केल्या आहेत. तर संपूर्ण अमेरिकेत कारवाई विरोधात निदर्शने, धरणे सुरू झाली आहेत.


अमेरिकेतील लॉस एंजलिस टाइम्सच्या वृत्तात हा दावा करण्यात आला आहे. या वृत्तानुसार पहिल्यांदा 50 ठिकाणी हल्ले करण्याची योजना होती. आता त्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. पाच युद्धनौका आधीच सिरियानजीकच्या सागरी टप्प्यात तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय लढाऊ विमानांचा वापर करण्याबाबतही विचार सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांच्या विखुरलेल्या सैन्याला अधिकाधिक तडाखे देण्याच्या दृष्टीने अमेरिकेला अपेक्षेपेक्षा अधिक हल्ले करावे लागण्याची शक्यता आहे.


दरम्यान, बंडखोरांनी मालुला भागावर कब्जा केला आहे. जेहादींच्या तुकड्यासोबत सिरियातील बंडखोरांनी ख्रिश्चनांच्या ऐतिहासिक मालुला भागावर कब्जा केला आहे. सिरियन ऑब्जव्हेटरी फॉर ह्यूमन राइट्स संघटनेने हा दावा केला आहे. असाद यांच्या सैन्याला या ठिकाणाहून पिटाळण्यात आले.


जखमींना ब्रिटनला हलवले
रासायनिक हल्ल्यातील काही जखमींना वैद्यकीय चाचणीसाठी ब्रिटनला आणले होते. बंडखोर नेते अहमद असी अल जरब यांनी ही माहिती दिली. हल्ल्यात सिरीन वायूचा उपयोग करण्यात आल्याचा ब्रिटनचा दावा या आधारेच करण्यात आल्याचे वृत्त संडे टाइम्सने दिले आहे.


13 व्हिडिओ फिती जारी
अमेरिकी काँग्रेसच्या बैठकीच्या पूर्वसंध्येला सिनेट पॅनेलने दमास्कसमधील रासायनिक हल्ल्याच्या 13 व्हिडिओ चित्रफिती जारी केल्या. लष्करी कारवाईला समर्थ मिळवण्याच्या दृष्टीने एक दिवस अगोदर या चित्रफिती जारी करण्यात आल्या आहेत.


ब्रिटिश कंपन्यांचे उद्योग
सिरियातील हल्ल्यासाठी सरीन नावाचा विषारी वायू वापरण्यात आला होता.हा वायू तयार करण्यासाठी लागणारे ‘ सोडियम फ्लोराइड ’ हे रसायन ब्रिटिश कंपन्यांनीच विकले होते. असा गौप्यस्फोट ‘डेली मेल’ दैनिकाने केला आहे. सन 2004 ते 2010 या कालावधीत हा व्यवहार झाला.


घातक रसायनांचे पाच परवाने : सोडियम फ्लोराइड या घातक रसायनाच्या विक्रीवर बंदी आहे. परंतु सन 2004, 05, 07, 09 आणि सन 2010 या कालावधीत एकूण पाच परवाने ब्रिटनच्या उद्योग, संशोधन आणि कौशल्य खात्याने (बीआयएस) दोन कंपन्यांना जारी केले होते. हे बीआयएसनेही कबूल केले आहे. मात्र, औषधी आणि सौंदर्यप्रसाधनांसाठी याचा वापर केला जातो. रासायनिक अस्त्रांसाठी त्याचा उपयोग केल्याचे पुरावे नाहीत असा दावा बीआयएसच्या महिला प्रवक्त्याने केला आहे.

रासायनिक हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांचे फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

व्हिडिओसाठी बघण्यासाठी येथे क्लिक करा...