आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

World War जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर, सिरिया पेटणार!!!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनतेचा उठाव मोडून काढण्यासाठी सिरियाचे अध्यक्ष बशर अल-असाद यांनी प्रतिबंधित रासायनिक शस्त्रे वापरल्याचा आरोप करून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि मित्र राष्ट्रांनी लष्करी कारवाई करण्याचा पर्याय निवडला आहे. याला रशिया, चीनसह काही राष्ट्रांनी कडाडून विरोध केला आहे. सिरियात प्रतिबंधित रासायनिक शस्त्रे वापरण्यात आली नाही, अशी पावतीच या दोन राष्ट्रांनी दिली आहे. त्यामुळे सिरिया प्रश्नावरून मित्र राष्ट्रे आणि आशिया खंडातील दोन महासत्ता एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. पुन्हा एकदा लष्करी कारवाईवरून जग दोन पक्षांमध्ये विभागले गेले आहे. सिरियावर अमेरिकेने लष्करी कारवाई केली तर सिरियाच्या मदतीसाठी रशिया, इराण आणि चीन आपले लष्कर पाठविण्याची शक्यता जपळपास नाही. परंतु, या कारवाईतून अमेरिकेचा मुस्लिम राष्ट्रांविरोधी असलेल्या छुप्या अजेंड्याचा बुरखा फाटला तर त्या लाटेवर रशिया आणि चीन स्वार होऊ शकतात. अमेरिकेला धडा शिकविण्याची ही संधी हे राष्ट्र चुकविणार नाहीत. म्हणजेच तिसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजतील. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धापेक्षा कितीतरी प्रगत शस्त्रे आता या राष्ट्रांकडे आहेत. तिसरे महायुद्ध झाले तर कोट्यवधी निरपराध लोक आपले प्राण गमावतील. जिंकणार कुणीच नाही पण सृष्टी हरलेली असेल. पृथ्वीचा विनाश झालेला असेल, हे मात्र खरे.

काय आहे अमेरिकेचे छुपा अजेंडा... जाणून घ्या पुढील स्लाईडवर...