आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरिया लष्कराच्या गोळीबारीत 200 जणांचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिरियाच्या लष्कराने केलेल्या हल्यात 200 जणांचा मृत्यू झाल्याचा दवा विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी केला. हमा येथील फ्री सीरियन आर्मीचा अधिकारी अबू ओमर म्हणाले, की सुन्नी बहुल तेरायमिशा गावावर सीरियन सरकारच्या लष्कराने जोरदार हल्ला चढविला आहे. या हल्यात आत्तापर्यंत 220 नागरिक मृत्युमुखी पडले असून सुमारे 300 जखमी झाले आहेत.
तेरायमिशा येथे करण्यात आलेल्या लष्कराच्या कारवाईत तीन जवान ठार झाले असल्याचा दावा सीरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने केला आहे. दरम्यान, हमा येथील बंडखोरांनी तेरायमिशा येथे नरसंहार घडवून आणल्याचा दावा देखील वृत्तवाहिनीने केला आहे.