आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियाविरुद्ध युनोमध्ये 58 देशांची याचिका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दमास्कस - सिरियातील हिंसाचारावर आंतरराष्ट्रीय समुदायाने कडक भूमिका घेत सरकारच्या विरुद्ध संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत याचिका दाखल केली आहे. सरकारविरुद्ध युद्धगुन्हेगारीचा खटला चालवण्यात यावा, अशी मागणी करणारे 58 देशांनी केली आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मागणीवर सिरियाने आक्षेप घेतला असून देशातील हिंसाचारामागे परकीय शक्तींचा असल्याचा उलट आरोप केला आहे. दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्याचा आम्हाला अधिकार आहे. देशातील काही घटनांमागे परदेशी शक्तींचा हात आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, सिरियातील संघर्षावर या 58 देशांची ही कृती म्हणजे छळ आणि दुटप्पीपणा आहे. मार्च 2011 पासून देशात 60 हजार जणांचा मृत्यू झाला. मात्र, सिरियातील स्थिती अत्यंत गंभीर आहे, परंतु तक्रार करणारे देश शस्त्रधारी टोळ्यांना असलेला राजकीय, मीडिया आणि लष्करी पाठबळाकडे दुर्लक्ष करीत आहेत, असे असाद सरकारने म्हटले आहे.

तपासाचे आदेश
सिरियातील स्थिती पाहता आंतरराष्ट्रीय युद्धगुन्हेगारी न्यायालयात त्यावर खटला चालवला गेला पाहिजे. त्यासाठी सिरियात या अनुषंगाने तपास होण्याची गरज आहे, असे संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क विभागाच्या प्रमुख नवी पिल्लई यांनी गुरुवारी म्हटले होते.