आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Syrian Extremists Cut Off A Man's Hand As Punishment For Stealing

चोरी केल्याची क्रूर शिक्षा, सर्वांसमोर कापले हात, TWITTER वर शेअर केले फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(WARNING - GRAPHIC CONTENT)
अलेप्पो (सीरिया)- जनसमुदायासमोर एका युवकाचे हात कापतानाचे फोटो एका इस्लामिक संघटनेच्या सदस्यांनी TWITTER वर पोस्ट केले आहेत. ही घटना अलेप्पोजवळ असलेल्या मस्काना येथे घडली असून येथेच युवकाचे हात कापण्यात आले आहेत. या घटनेचे फोटो TWITTER वर टाकण्यात आले असून त्याला काही इस्लामिक संघटनांनी रिट्विटही केले आहे.
अल-कायदा समर्थित संघटना इस्लामिस्ट स्टेट इन इराक अॅण्ड सीरियाने याची जबाबदारी स्वीकारली आहे. चोरी करणाऱ्या व्यक्तीला अशाच स्वरूपाची कठोर शिक्षा दिली जाईल, असे या संघटनेने सांगितले आहे.
चोरी करणाऱ्या युवकाने त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप स्वीकारले होते. त्यानेच माझे हात कापून टाकावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. चोरीच्या पापापासून मुक्ती मिळण्यासाठी त्याने हात कापावेत असे सांगितले होते, असा दावा या संघटनेने केला आहे. TWITTER वर हे फोटो शेअर करण्यात आल्यानंतर काहीच वेळात काढून टाकण्यात आले.
या भयावह घटनेचे फोटो बघा, पुढील स्लाईडवर