सिरियातील हिंसाचारात 25 / सिरियातील हिंसाचारात 25 ठार

वृत्तसंस्था

Dec 30,2011 10:51:46 PM IST

डमास्कस - राजधानीतील उत्तर भागात शुक्रवारी हजारो लोक सरकारच्या दमनचक्राविरोधात निषेध करण्यासाठी एका रॅलीत सहभागी झाले होते. त्यांच्यावर सुरक्षा जवानांनी केलेल्या हल्ल्यात 25 नागरिक ठार झाले. डौमा भागातील एका प्रार्थनास्थळाजवळ सुमारे 30 हजार लोक जमले आहेत. त्या अगोदर अरब लीगचे निरीक्षक देशात दाखल झाले. निरीक्षकांचा हा दौरा तीन दिवसांचा असून या काळात ते देशातील हिंसाचार बंद करण्याच्या मोहिमेवर असतील. आतापर्यंत देशात 5 हजार लोकांचा बळी गेला आहे. गेल्या आठ दिवसांत लष्करी अत्याचाराचे प्रमाण वाढले असून सुमारे 70 लोकांचा मृत्यू झाल्याचे बंडखोरांचे म्हणणे आहे. रॅलीच्या आयोजनातून निरीक्षकांना सरकारविरोधी असंतोष दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

X
COMMENT