आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिरियन राष्ट्राध्यक्ष बशर असाद यांच्यावर बंडखोर गटाकडून जोरदार हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दमास्कस - सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर असाद यांच्यावर बंडखोर गटाकडून गुरूवारी जोरदार हल्ला झाला. बंडखोरांनी असाद यांच्या ताफ्याला गोळीबार व रॉकेटने लक्ष्य केले. सुदैवाने असाद बालंबाल बचावले. ते ईदच्या निमित्ताने सार्वजनिक प्रार्थनेमध्ये सहभागी झाले होते.


सिरियातील बंडखोर गटाने या हल्ल्याचा दावा केला. दरम्यान, सिरिया सरकारने हल्ल्याचे वृत्त फेटाळले आहे. मलाकी जिल्ह्यात एका मशिदीत असाद प्रार्थनेसाठी सहभागी झाले होते. त्याच वेळी हा हल्ला झाला. त्याचे वृत्त सरकारी टीव्हीवरून देखील प्रसारित झाले. परंतु देशाच्या माहिती मंत्री ओमरन अल-झौबी यांनी हल्ला झाल्याच्या वृत्ताचा इन्कार करण्यात आला आहे. वास्तविक असाद यांची सुरक्षेचे कवच भेदणे तितकेसे सोपे नाही. तरीही बंडखोरांनी त्यांना लक्ष्य केले. हल्ल्याच्या अगोदर सरकारी टीव्ही फूटेजमध्ये असाद मलाकी जिल्ह्यातील प्रार्थना सभेत सहका-यांसह बसलेले दाखवण्यात आले आहे.