बैरुत - सिरियाच्या सीमेवर लेबनॉनचे लष्कर आणि इस्लामी गट यांच्यात रविवारी झालेल्या चकमकीत 11 अतिरेकी ठार झाले, तर 8 लेबनॉन जवानांचाही मृत्यू झाला. ही घटना सिरियाच्या पूर्वेकडील भागात घडली. अल कायदाशी संबंधित दहशतवाद्यांनी यापूर्वी येथील एका पोलिस ठाण्यावर ताबा मिळवून दोन जवानांना मारले होते. त्यानंतर लेबनॉनने त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली. चकमकीतील इस्लामी गटाच्या बंदूकधार्यांमध्ये इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांचा समावेश आहे, असे लेबनीज अधिकार्यांनी स्पष्ट केले. कट्टर सुन्नी गटाने सिरिया आणि
इराकमधील मोठय़ा प्रदेशावर कब्जा केला आहे. सिरियातील नागरी संघर्ष सुरू झाल्यापासून अर्सल या सीमेवरील शहरातील ही मोठी चकमक आहे. लेबनॉनमध्ये सिरियाच्या मुद्दय़ावरून कट्टर गटांमध्ये हिंसाचार आणखी उफाळून येऊ शकतो, असे जाणकारांना वाटते.