आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taharik E Taliban Pakistan Chief Mulla Fajlulla Warns In Video Will Strike Harder Than Peshawar

पुढील हल्ला पेशावरपेक्षाही जास्त भयावह असेल; तालिबानींची पा‍किस्तान सरकारला धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: टीटीपीचा म्होरक्या मुल्ला फजलुल्ला उर्फ मुल्ला रेडिओ)

नवी दिल्ली/इस्लामाबाद- तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मुल्ला फजलुल्ला याने पाक सरकारला धकमी दिली आहे. मुल्ला फजलुल्लाने धमकीचा व्हिडिओ जारी केला आहे. व्हिडिओद्वारा पाकिस्तान सरकारला मुल्लाने धमकी दिली आहे.

'पुढील हल्ला पेशावरमधील आर्मी स्कुलवर झालेल्या हल्ल्यापेक्षा जास्त भयावह असेल', असे मुल्लाने म्हटले आहे. हे वृत्त 'एनडीटीव्ही'ने 'उमर मीडिया'च्या हवाल्याने दिले आहे. 'उमर मीडिया' हे टीटीपीचा मीडिया विंग आहे. उमर मीडियाने पत्रकारांना धमकीच्या व्हिडिओची लिंक इ-मेलद्वारा पाठवली आहे.

दरम्यान, गेल्या 16 डिसेंबरला पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 132 निरागस विद्यार्थ्यांसह 145 नागरिकांचा मृत्यु झाला होता. पाकिस्तान सरकारने फजलुल्लावर एक लाख डॉलरचे (जवळपास 63 लाख रुपये) बक्षिस ठेवले आहे.
मुल्ला रेडिओचे स्पष्टीकरण...
12 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये 'मुल्ला रेडियो' काही शस्त्रधारी दहशतवाद्यांसोबत एका अज्ञात ठिकाणी दिसत आहे. टीटीपीने पेशावरमधील आर्मी स्कूलमधील विद्यार्थ्यांना तालिवानी कैद्यांच्या सुटकेसाठी वेठीस धरले होते. मात्र, पाक‍िस्तान आर्मीने गोळीबार केल्यामुळे आम्हाला आमची भूमिका ऐनवेळी बदलावी लागली, असे मुल्लाने इराणी भाषेत स्पष्टीकरण दिले आहे. आर्मी स्कूलमधील विद्यार्थी मोठे झाल्यानंतर आमच्या विरोधात युद्ध लढले असते, असेही मुल्लाने म्हटले आहे.

पाक सरकारला धमकी...
पाक सरकारने आमच्या सहकारी कैद्यांसोबत दुर्व्यवहार करणे बंद न केल्यास पेशावरपेक्षा जास्त भयावह हल्ला घडविला जाईल, अशा शब्दात मुल्ला रेडिओने पाक सरकारला धमकी दिली आहे. आर्मी आणि आमच्यात युद्ध सुरु आहे. तुम्ही आमच्या सहकार्‍यांना माराल तर तुमचेही लोक मारले जातील, असा इशाराही मुल्लाने दिला आहे. नंतर तालिबानींना पाठिंबा देण्याचे आव्हान करत एक रॉकेट चालित ग्रेनेड फायर करताना दिसतो.
दरम्यान यापूर्वी मुल्ला फजलुल्ला ठार झाल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर त्याचा धमकीचा व्हिडिओ समोर आल्याने पाकिस्तान सरकारला धक्का बसला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, कोण आहे मुल्ला फजलुल्ला...